Wednesday, March 11, 2026
Homeजळगावभुसावळमध्ये 20 वर्षीय तरुणी हरवली; पोलीसांनी नोंद केली

भुसावळमध्ये 20 वर्षीय तरुणी हरवली; पोलीसांनी नोंद केली

भुसावळमध्ये 20 वर्षीय तरुणी हरवली; पोलीसांनी नोंद केली

भुसावळ प्रतिनीधी दि 11
दि ८ मार्च २०२६ रोजी पार्वती बसंत बनारसी (वय २०) ही घरातून अचानक निघून गेल्याची तक्रार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.पार्वती घरातून न सांगता गेल्याने तिचे नातेवाईक व स्थानिक लोक शोधत आहेत, परंतु अद्याप तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर तिच्या आई लक्ष्मी वसंत बनारसी यांनी ११ मार्च २०२६ रोजी पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पार्वतीची उंची सुमारे ५ फूट ४ इंच असून, केस काळे, मोठे व लांब आहेत. ती निळ्या रंगाचा कुर्ता आणि निळी पँट घालून होती. माथ्यावर जखमेची खुण आहे, जी तिची विशेष ओळख पटविणारी आहे.भुसावळ पोलीस ठाणे आणि पोलीस निरीक्षकांनी शहरातील नागरिकांना पार्वती शोधण्यात मदत करण्याचे आवाहन केले आहे. काहीही माहिती असल्यास खालील नंबरवर संपर्क करण्याची विनंती करण्यात आली आहे:
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे – 0252-222399पोलीस निरीक्षक, भुसावळ पोलीस ठाणे – 9922276667
पोकॉ 1572 श्री कृष्णा पाटील भुसावल बाजारपेठ मोबाईल नंबर 88 88 67 52 82

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या