मेंढ्यांच्या गोल रिंगणाने भूममध्ये मुक्ताई पालखीचे स्वागत!
भूम येथे मुक्ताई माऊलींच्या नामघोषात भक्तिभावाने गगन भरले
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे भूम येथे आगमन झाल्यानंतर एक अनोखा आणि भक्तिभावपूर्ण प्रसंग अनुभवास आला.पालखी आगमनाच्या क्षणी मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले.या अद्भुत दृश्याने सर्व वारकरी आणि ग्रामस्थ थक्क झाले.
पालखी सोहळ्याचा आज २४ वा दिवस असून, आज दुपारी पालखी सोहळ्याचा विसावा आष्टा (ता. भूम, जि. धाराशिव) येथे आहे. यानंतर रात्रभर मुक्काम जवळा (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे होणार आहे.
वारीत सहभागी वारकरी मंडळींचा उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. “जय मुक्ताई माऊली!” च्या गगनभेदी जयघोषात पालखी पुढे सरकत आहे. ठिकठिकाणी ग्रामस्थ व भाविक मंडळी भक्तिभावाने फुलांची उधळण, नामस्मरण व महाप्रसादाचे आयोजन करून पालखीचे स्वागत करत आहेत
ही वारी भक्ती, श्रध्दा आणि संस्कृतीचा संगम ठरतो आहे. हजारो वारकऱ्यांची नित्यनेमाने होणारी उपस्थिती आणि स्थानिक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे यंदाचा सोहळा विशेष उठावदार ठरत आहे.