नायगाव येथील संवेदनशील उपशिक्षक बी.डी.पाटील सेवानिवृत्त.
यावल दि.२९ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयातील संवेदनशील आणि आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज काढून देण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे आणि इतर विद्यार्थ्यांचे प्रिय असलेले उपशिक्षक बी.डी.पाटील हे सोमवार दि.३० जून २०२५ रोजी ३० वर्षाच्या प्रदीर्घ यशस्वी सेवेतून निवृत्त होत आहेत.
उपशिक्षक बी.डी.पाटील यांनी नायगाव येथील सातपुडा विद्यालयात अध्यापनाचे उत्कृष्ट असे कार्य केले,विद्यार्थ्या प्रती असलेली त्यांची संवेदनशीलता आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुका मुळे ते विद्यार्थ्यांमध्ये तसेच आपल्या सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गात प्रिय ठरले आहेत.
शिक्षकाचे सौंदर्य शिकवण्यात लपलेलं असतं, संस्काराचे सौंदर्य आचरणात लपलेलं असतं, आणि आचरणाचे सौंदर्य समाज जीवनात प्रकट होत असतं असे हाडाचे असलेले उपशिक्षक बी.डी.पाटील सर यांची निवृत्ती म्हणजे एक विद्यालयातील शैक्षणिक एका युगाचा अंत आहे. परंतु शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून तुमचा वारसा कायम सुरू राहील अशा शुभेच्छा नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने दिल्या आहेत.
बी.डी.पाटील सरांनी आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी फॉर्म फी भरून परीक्षेत बसण्यास मदत केली तसेच अनेक विद्यार्थ्यांना आपल्या इतरत्र परीक्षेला बसवून शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी प्रवृत्त केले सरांचे अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर आहे ही त्यांच्या शैक्षणिक कार्याची पोचपावती आहे, सामाजिक बांधिलकी जोपासणारा माणूस सर्व समाजाच्या सुख आणि दुःखात मिसळून शिक्षक विद्यार्थी प्रिय व समाजप्रिय शिक्षक म्हणून नाव रूपात आलेले उपशिक्षक बी. डी.पाटील सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या भावी आयुष्यासाठी मुख्याध्यापक वाय.एम.नायदे, यावल येथील सेवानिवृत्त शिक्षक पी.एस. सोनवणे सर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.