Sunday, June 29, 2025
Homeजळगावव्यसनमुक्त तरुण राष्ट्राचा अमूल्य ठेवा : डॉ. नरेंद्र महाले

व्यसनमुक्त तरुण राष्ट्राचा अमूल्य ठेवा : डॉ. नरेंद्र महाले

व्यसनमुक्त तरुण राष्ट्राचा अमूल्य ठेवा : डॉ. नरेंद्र महाले

यावल दि.२९  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील राजोरे येथील
एल.एम.पाटील विद्यालय राजोरे तालुका यावल येथे दि. २६ जून हा जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला.त्यात व्यसनमुक्त तरुण हा राष्ट्राचा अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील शिक्षक तथा यावल तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र महाले यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी,फसव्या जाहिराती पासून सावध होऊन स्वतःचे आयुष्य व्यसनमुक्त करावे,या उद्देशाने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या मार्गदर्शनातून एक प्रभावी व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एस साळुंके सर,प्रमुख पाहुणे म्हणून यावल तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र महाले सर आणि राजोरे येथील सामाजिक कार्यकर्ते मयुर महाजन उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत असताना डॉ.नरेंद्र महाले यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन शरीराला कसे घातक ठरते याची सविस्तर माहिती देत असताना आपल्या पेक्षा मोठ्या मुलांचे अनुकरण करणे कसे आरोग्यासाठी घातक ठरते हे स्पष्ट करून फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना आरोग्य उत्तम राखून उद्याच्या भारत हा सुदृढ व्हावा यासाठी शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांची भूमिका प्रकर्षाने विद्यार्थ्यांना समजून दिली यात व्यसनांपासून दूर राहण्याचा अतिशय समर्पक उदाहरणे देऊन विचार मांडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक जी.एस.साळुंके सरानी विद्यार्थांना सांगितले की विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्यसनमुक्त जीवनावर अवलंबून असते.गावातील काही मोठी मुले आणि माणसे तंबाखू,गुटखा,दारू याचे सेवन याच्या समोर करत असतील तर त्यांना अमली पदार्थ सेवन करू नका असा आग्रह धरा. आणि तुम्हाला भविष्यासाठी त्यांनी निर्व्यसनी असणे आवश्यक आहे असे सांगा म्हणजे लोक व्यसनापासून दूर जातील.
कार्यक्रम प्रसंगी राजोरे येथील सामाजिक कार्यकर्ते मयुर महाजन यांनी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे नाशिक विभाग संघटक प्रमुख प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी पाठवलेली शपथचे वाचन केले. आणि त्यांच्या मागून विद्यार्थ्यांनी ती शपथ ग्रहण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजुम तडवी मॅडम,आभार वैशाली इंगळे मॅडम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर.ए.सुरनर सर,मीनाक्षी नारखेडे मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या