यावल नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना मोफत सनदीका केव्हा मिळणार..?

प्रशासक,मुख्याधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी.
यावल दि.१ खानदेश लावी न्यूज प्रतिनिधी यावल नगरपरिषदेत ज्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्ष किंवा त्याहून अधिक झाली आहे अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सफाई कामगार सेवेत असताना मृत्यू झाल्यास अशा सफाई कामगारांच्या निधनानंतर त्यांच्या पात्र वारसास मालकी तत्वावर मोफत सनदीका देण्याबाबत नगरविकास विभागाने दि.२२ ऑक्टोबर २००८ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे परंतु यावल नगरपरिषदेने आज पर्यंत सनदीका देण्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने ती कार्यवाही यावल नगरपरिषद प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी तात्काळ करण्याची मागणी सफाई कामगारांनी केली आहे.
दि.३१ जानेवारी २०२२ रोजी यावल नगरपरिषद प्रशासक आणि यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष बबलू गणेश घारू, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, तत्कालीन शहराध्यक्ष निलेश सुरेश गडे, यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सापडल्या आवास योजनेअंतर्गत मोफत सनदी का मिळणेसाठी ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा 25 वर्षे पेक्षा जास्त होऊन सेवानिवृत्त झालेले आहे अशा सफाई कर्मचारी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मोफत सनदीका देण्याचा शासन निर्णय झालेला आहे.
दि.२० फेब्रुवारी २०२० सेवानिवृत्त सफाई कामगारांनी लेखी निवेदन देऊन सफाई कर्मचाऱ्यांना सनदी का देण्यास दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार केली होती आणि आहे. त्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा लेखी व तोंडी तक्रारी केल्या असल्या तरी नगरपालिका प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी सफाई कर्मचाऱ्यांना मोफत सनदी का वाटप बाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने ती कारवाई आता तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

