Tuesday, August 25, 2026
Homeजळगावसाफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली बेदम मारहाण !

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली बेदम मारहाण !

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली बेदम मारहाण !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी– साफसफाई करण्याच्या कारणावरून तीन जणांनी शरीफ खान सिकंदर खान (रा. सालार नगर) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तर एका जणाने डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली. या ठिकाणी काम करणाऱ्या महिलेला खान यांनी दमदाटी केली. ही घटना ३० जून रोजी सेंट जोसेफ शाळेसमोर घडली आहे. परस्परविरोधी तक्रारीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
साफसफाई करण्याच्या कारणावरून ३० जून रोजी तेथेच काम करणाऱ्या कोकिळा गोविंद साळी यांच्याशी वाद झाला. त्यावरून सदर महिला, तिचा मुलगा व अन्य एका जणाने खान यांना शिवीगाळ व दमदाटी केली. महिलेच्या मुलाने डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली. याप्रकरणी खान यांचा मुलगा शाकिब खान यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद महिलेने दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, साफसफाई करण्याच्या कारणावरून शरीफ खान याने शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी शरीफ खानविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरीफ खान सिकंदर खान हे सेंट जोसेफ शाळेत साफसफाईचे काम करतात.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या