यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.शामकांत जी. कवडीवाले तर सचिवपदी ॲड. शेखर तडवी.

यावल दि.२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुका वकिल संघाच्या अध्यक्षपदी ॲड.शामकांत जी. कवडीवाले व सचिवपदी ॲड. शेखर सुजात तडवी व ग्रंथपालपदी ॲड.भूषण बी.महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावल तालुका वकिल संघाची दि.१ जुलै २०२५ रोजी बैठक यावल तालुका वकील संघाच्या बा रूममध्ये बैठक संपन्न झाली. बैठकीत नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.त्यात सर्वानुमते अध्यक्षपदी ॲड.शामकांत जी.
कवडीवाले (यावल) व सचिव पदी ॲड. शेखर सुजात तडवी (इचखेडा) व ग्रंथपाल पदी ॲड. भूषण बी.महाजन (यावल) यांची बिनविरोध निवड करण्यात आली व तसा सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला.सदर सभेस माजी अध्यक्ष नितीन एम.चौधरी व माजी सचिव आकाश यु.चौधरी,
ॲड.राजेश.पी.गडे, ॲड.एस.आर.लोंढे.ॲड.के.डी. पाटील,ॲड.गोविंदा.एम.बारी,ॲड.अजय एम.
कुलकर्णी,ॲड.खालिद शेख,ॲड.किशोर डि.सोनवणे, ॲड.अशोक आर.सुरळकर,ॲड. उमेश सी.बडगुजर,ॲड.निवृत्ती पी.पाटील,
ॲड.एस.एस.कुलकर्णी,ॲड.विनोद परतणे ॲड.मोहीत शेख,ॲड.स्वाती ओ.साठे,ॲड.धिरज चौधरी,ॲड.दत्तात्रय सी. सावकारे ॲड.याकुब अ.तडवी ॲड.रितेश बारी.ॲड.गौरव पाटील, ॲड.रियाज एन.पटेल,ॲड.देवकांत पाटील,
ॲड.यशवंत दानी,ॲड.फैजल शेख ॲड.स्मिता कवडीवाले,ॲड.मोनीका सावकारे,ॲडिशनल हेमांगी चौधरी,ॲड डिंपल सुरळकर ॲड.श्याम पी. इंगळे ॲड.स्वाती पी.पाटील ॲड.दीपक वाणी,
ॲड.योगी शेलार,ॲड.बदूद शेख आमिन,
अँड,रोहित इंधाटे,ॲड.चित्रा भावसार आदी सर्व वकिल संघाचे सभासद उपस्थित होते.सर्व सभासदांनी नुतन कार्यकारणीचे अध्यक्ष ॲड.शामकांत जी.कवडीवाले व सचिव ॲड.शेखर सुजात तडवी (इचखेडा) व ग्रंथपाल ॲड.भूषण बी.महाजन यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

