भुसावळ महसूल प्रशासनाचा वाळू तस्करावर कारवाईचा बडगा सुरूच

भुसावळ प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
भुसावळ तहसील दार यांच्या मार्फत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वर कारवाई सुरू आहे .
दिनांक 3 जुलै 2025 रोजी नीता लबडे तहसीलदार भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाघुर नदी पात्र जोगलखेडा शिवार परिसरात अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक तपासणी कामी पथक गस्तीवर गेले असता जंगल सदृश्य परिस्थितीत विविध 4 ते 5 ठिकाणी अंदाजे ४/५ ब्रास वाळू चे ढीग आढळून आले महसूल पथकाने यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सदर वाळू साठ्याची पाहणी करून सदरचे वाळू साठ्याचे पंचनामे करून जप्त करून सुरक्षित स्थळी भानखेडा येथील जिल्हा परिषद शाळा परिसर येथे हलवण्याचे सूचना देण्यात आल्या त्यावरून सदरचा साठा काही वाहन व जेसीबी द्वारे हलविण्यात आला असून भानखेडा पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे .

सदर वाळू शासन परिपत्रक, घरकुलास मोफत वाळू उपलब्ध करून देणे, अनुषंगाने सदरची वाळू उपलब्धतेप्रमाणे जोगलखेडा भानखेडा गावातील घरकुलाच्या लाभार्थी यांना प्रति लाभार्थी 2 ब्रास प्रमाणे दिनांक 4 जुलै 25 रोजी नियमानुसार वाटप करणे बाबत ग्रामपंचायत प्रशासन व महसूल कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या.

तहसीलदार नीता लबडे यांनी नदीपात्राच्या परिसराची पाहणी वेळी शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प यांचेकडून कडगाव जोगलखेडा या गावास जोडणारा पुलाचे बांधकाम ठिकाणी गेले असता तेथे देखील अंदाजे 60 ब्रास वाळूचा साठा आढळून आला आहे सदर साठा बाबत शहानिशा करून विल्हेवाट लावण्यात येईल.तसेच रस्ता बनवणे कामीं वापरलेला मुरूम व माती याबाबत देखील पंचनामे करून सदरचा साठा जप्त करून घरकुल लाभार्थी यांना वितरित करणे बाबत सूचना दिल्या आहेत सदर कार्यवाही मध्ये मंडळ अधिकारी प्रवीण पाटील, तलाठी साकेगाव मिलिंद तायडे, तलाठी नितीन केले आदीनी सहभाग घेतला

