सातपुड्यातील गाडऱ्या – जामन्या येथे आश्रमशाळेत हिवताप प्रतिबंधक जनजागृती

यावल दि.३. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडासिम
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सातपुडा जंगलातील अतिदुर्गम भागात असलेल्या गाडऱ्या,
जामन्या,ऊसमळी, लंगडा आंबा, येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर,तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.राजू तळवी,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे,सावखेडा वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बारेला,डॉ. निखिल पाटील,आरोग्य सहायक
नालेनाना,डोलेनाना यांच्या मार्गदर्शनानुसार.पावसाळ्याचा पार्श्वभूमीवर उपकेंद्र जामन्या अंतर्गत जामन्या गाडऱ्या व ऊसमळी,लंगडा आंबा येथे आरोग्य विभाग कडून डेंग्यू,मलेरिया या आजाराची माहिती देत,तसेच साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करावायचा याबददल जिल्हा परिषद शाळा,व आश्रम शाळा येथे सर्व मुला मुलींना स्वच्छतेचे महत्व,व हात धुण्याचा पद्धती,मलेरिया पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे यावर भर देऊन विद्यार्थ्यांना पावसाळ्यात काय खबरदारी घेता येईल तसेच परिसर स्वच्छता,गावातील उखरडे, साचलेली डबकी त्यात क्रूड ऑइल टाकणे तसेच,ती डबकी कशी बुजवता येईल,तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे आणि घरातील पाण्याचा टाक्या घासून,पुसून,झाकून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.तसेच गावात जलद ताप सर्व्हे,अंतर्गत आश्रम शाळा विद्यार्थी यांना कोणताही ताप हा अंगावर न काढता आपण येता कण कण तापाची करा तपासणी रक्ताची तपासणी करणे गरजेचे आहे व सकस आहार घेणे देखील घेणे आशा मूलभूत आहाराची तत्वे या बाबत देखील जनजागृती करण्यात आली.व काळजी बाबत सूचना देण्यात आल्यात यावेळी आरोग्य सेवक हेमंत पवार यांनी सर्व माहिती सांगितली.सदर वेळी आरोग्यसेविका पूनम गावडे, समुदाय आरोग्य अधिकारी निलेश बोडे, व आश्रम शाळा व जि.प. शाळा मुख्याध्यापक व शिक्षक आशा सेविका,अंगणवाडी सेविका, प्रवर्तक उपस्थित होते.

