Friday, May 1, 2026
Homeजळगावबचत गटाचा फिरता निधी नियमित भरणा होतो का.?

बचत गटाचा फिरता निधी नियमित भरणा होतो का.?

बचत गटाचा फिरता निधी नियमित भरणा होतो का.?

सामाजिक कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी.

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अनेक बचत गट महिलांनी रोख जमा केलेला निधी नियमाप्रमाणे, नियमित भरणा झालेला आहे किंवा नाही..? याबाबतची चौकशी करण्याची मागणी यावल येथील सामाजिक कार्यकर्ता प्रवीण बाळू डांबरे यांनी केली आहे.

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगरपरिषद प्रशासन मुंबई, राज्य अभियान व्यवस्थापक कक्ष यांच्याकडे प्रवीण डांबरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की फैजपूर ता.यावल येथील नगरपरिषद अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियाना अंतर्गत बचत गटाचे काम चालू आहे सदर अभियाना मधील ‘समाविष्ट असलेल्या अनेक गटांना फिरता निधी १० हजार प्रमाणे दिला गेला आहे त्यातील २०१७ पासून तर आज पर्यंत म्हणजे एप्रिल २०२५ पर्यंत अनेक गटांनी फिरता निधी (RF) परत केलेला आहे त्यातील अनेक गटांनी फिरता निधी हा नगद (कॅश ) स्वरुपात शहर प्रकल्प अधिकारी प्रवीण सपकाळे यांच्या कडे परत केलेला आहे तरी ज्यां गटांनी फिरता निधी नगद (कॅश ) स्वरुपात जमा केलेला आहे. तो फिरता निधी आपल्या
अभियानातील नियमाप्रमाणे, नियमितपणे खात्यात जमा झाला आहे किंवा नाही.? आणि कोणत्या बँक खात्यात जमा केला आहे ?
तसेच ज्या गटांनी फिरता निधी नगद (कॅश) स्वरुपात जमा केलेला आहे तो ज्या दिवशी रक्कम घेतली त्या दिवशी भरणा केलेला आहे काय.? तसेच नगद (कॅश ) स्वरुपात फिरता निधी घेता येतो का.? अजून पर्यंत अनेक
गटांनी फिरता निधी जमा करूनही त्यांना बँक भरणा पावती का देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे संबंधित काही बचत गटामधील सदस्यांमध्ये असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की यात काही अफरातफर आहे झाली आहे काय.? याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित अधिकारी यांची सखोल चौकशी करावी व ज्या गटांनी ( कॅश) नगद स्वरुपात फिरता निधी ज्या तारखेस जमा केला आहे त्या तारखेच्या बँक भरणा पावत्या त्या बचत गटांना मिळायला पाहिजे अशी मागणी बचत गटांकडून / तक्रारदाराकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या