Friday, May 1, 2026
Homeजळगावयावल येथील आठवडे बाजार नगरपरिषद आणि पोलीस यांच्या देखरेख खाली.

यावल येथील आठवडे बाजार नगरपरिषद आणि पोलीस यांच्या देखरेख खाली.

यावल येथील आठवडे बाजार नगरपरिषद आणि पोलीस यांच्या देखरेख खाली.

रस्त्यावरील विक्रेत्याला ५ हजाराचा दंड होणार…

यावल दि.४  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथे दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार आज दि.४ जुलै २०२५ रोजी यावल पोलीस आणि यावल नगरपरिषद कर्मचारी यांच्या देखरेख खाली भरल्याने बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राज्य मार्गाने, वाहतूकदारांनी,बाजार करणाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला तसेच रस्त्यावर जो विक्रेता आढळून येईल त्याकडून ५ हजार रुपयांचा दंड आकारणी केला जाईल अशी माहिती यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दिली,पर्यायी रस्त्यावर आज अतिक्रमण दिसून न आल्याने याच प्रमाणे आठवडे बाजारात विक्रेत्यांना शिस्त लागायला पाहिजे अशी यावल शहरात चर्चा आहे.

यावल येथील आठवडे बाजार दर शुक्रवारी भरत असतो बऱ्हाणपूर अंकलेश्वर राज्यमार्गाच्या बाजूला बाजाराची जागा गेल्या अनेक वर्षापासून निश्चित असल्याने काही हाथगाडी व इतर विक्रेते हे भर रस्त्यात आणि राज्यमार्गाच्या साईट पट्ट्यांवर उभे राहून / बसून आपला माल विकत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता.गेल्या शुक्रवारी एक महिला अतिक्रमणामुळे रस्त्यावरील वाहनामुळे जखमी होऊन औषध उपचार सुरू असताना निधन झाल्याने यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती याची दखल घेत यावल पोलीस आणि नगरपरिषदेने आज बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राज्य मार्गावरील अतिक्रमाणाला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध केला असता रस्त्याने आणि आठवडे बाजाराने मोकळा श्वास घेतला त्यामुळे यावल करांमध्ये समाधानकारक रित्या बोलले जात आहे.दर आठवड्याला अशाच प्रकारे विक्रेत्यांना शिस्त लावण्याची मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.
——————————————–

एकाच दिवशी २ ठिकाणी आठवडे बाजाराची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली कशी..?

यावल शहरात गेल्या ४०-५० वर्षापासून आठवडे बाजार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या बाजूला म्हणजे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर या महामार्गाच्या बाजूला असलेल्या नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर भरत होता आणि आहे.
या ठिकाणी दर आठवड्याला आठवडे बाजार भरत असताना गेल्या पाच-सात वर्षापासून यावल शहरात म्हसोबा देवस्थानापासून तर बोरावल दरवाज्यापर्यंत शहरातील भर रस्त्यावर आठवडे बाजार भरण्याची ( यावल शहरात एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन ठिकाणी आठवडे बाजार भरण्याची परवानगी )परवानगी जिल्हाधिकारी जळगाव,प्रांताधिकारी,तहसीलदार यावल,किंव्वा यावल पोलिसांनी कोणत्या नियमानुसार आणि कोणाच्या आदेशानुसार दिली याबाबत सुद्धा यावल तालुक्यात जोरदार चर्चा आहे. यावल शहरात भर रस्त्यावर आठवडे बाजार भरत असल्याने यावल शहरात एखाद्या वेळेस काही अप्रिय घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहणार याचा खुलासा संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जनतेच्या माहितीसाठी करायला पाहिजे अशी चर्चा सर्व स्तरातील नागरिकांमध्ये आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या