निधन वार्ता


कै. मधुकर माधव लोखंडे
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगर, शिवगंगा चौक बिजली कॅालनी येथील रहिवासी मधुकर माधव लोखंडे याचे ५ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता , वृद्धपकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, नातवंडे, असा परिवार आहे. ते दत्तात्रय व राजेश लोखंडे यांचे वडील होत. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. त्यांच्या निधनाने परिसरात दु:ख व्यक्त केले जात आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा आंनद नगर शिवगंगा चौक बिजली कॅालनी येथील राहत्या घरुन निघणार असुन त्यांच्या वर तापी नदीच्या काठावर असलेल्या वैकुंठ धामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे*. *त्याच्या अंत्ययात्रेत सर्व समाज बांधव उपस्थित राहणार आहे*

