Friday, May 1, 2026
Homeजळगावयावल नगरपरिषद प्रभारी आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू यांच्या बदलीची मागणी.

यावल नगरपरिषद प्रभारी आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू यांच्या बदलीची मागणी.

यावल नगरपरिषद प्रभारी आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू यांच्या बदलीची मागणी.

यावल दि.७     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      यावल नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक वीरेंद्र गोपाल घारू हे यावलचे मूळ रहिवासी असल्याने ते जाणून बुजून यावल नगरपरिषद महिला सफाई कामगारांना नाहक त्रास देत असल्याने त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट ) पक्षाचे पदाधिकारी कामराज रूपचंद घारू यांनी नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे दि.७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू हे मुळचे यावल येथील रहिवाशी असून ते जाणून बुजून आरोग्य विभागातील सफाई कामगारांना मानसिक त्रास देत आहे महिला कर्मचारी यांना अरेरावीचे शब्द वापरतात व महिला मुकडम यांना काही दिवस अगोदर अरेरावी केली होती. त्याबाबत त्यांची तक्रार करण्यात आली होती परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई झाली नाही.
आरोग्य निरीक्षक हे महिला कामगारांच्या वैयक्तिक मोबाईल द्वारा जीपीएस फोटो काढण्यास सांगतात.फोटो काढण्याबाबत शासनाचे कोणत्याही अटी शर्ती परिपत्रक नियम नाही तरीसुद्धा अशा प्रकारे महिला कामगार यांना मानसिक त्रास देत आहे.म्हणून आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू यांची यावल येथून तात्काळ बदली करण्यात यावी.तसेच बदली न झाल्यास कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा कामराज घारू यांनी दिला आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास शाखा सहाय्यक आयुक्त काय कारवाई करतात याकडे यावल नगरपरिषद महिला कामगारांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या