एम.टेक परीक्षेत
प्रसाद प्रमोद यावलकर उत्तीर्ण

यावल दि.८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील प्रसाद प्रमोद यावलकर यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एम.टेक ( कॉम्प्युटर सायन्स ) पदवी ८० टक्के गुणवत्तेसह संपादनकरून
यावल शहराच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांनी हे शिक्षण महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था
गव्हमेंट इंजिनिअरिंग कॉलेज,अमरावती येथून पूर्ण केले.प्रसाद हे डॉ.निता प्रमोद वाणी यांचे सुपुत्र आहेत,त्यांनी ऐनपूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली असून आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत.तर यावल समाचार चे व्यवस्थापक प्रमोद वाणी यांचे सुपुत्र आहेत तसेच “यावल समाचार’च्या संपादिका सौ.एम.बी.वाणी व सामाजिक कार्यकर्ते तसेच फेस्कॉमचे सक्रीय सदस्य बाळकृष्ण वाणी यांचे नातू आहेत. प्रसाद यांना बालपणापासूनच अभ्यासाची गोडी होती.त्यांनी एम.टेक करण्याचा निर्धार करून सातत्याने मेहनत घेतली.त्यांच्या यशामागे पालकांचे मार्गदर्शन,कुटुंबीयांचे पाठबळ व शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच प्रथमेश जितेंद्र खारोळे व सौ.योगेश्वरी खारोळे यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी अभ्यासासोबतच संगणक क्षेत्रातील नविन तंत्रज्ञानातही रुची दाखवली असून भविष्यात आयटी किंवा शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत होण्याची त्यांची इच्छा आहे. प्रसाद याच्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातील नागरिक,मित्र परिवार व सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींनी त्याचे अभिनंदन केले आहे.विद्यार्थयांनी प्रेरणा घ्यावी अशी उल्लेखनीय,गौरवशाली वाटचाल त्यांनी केली आहे

