Friday, May 1, 2026
Homeजळगावयावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल,व बाल संस्कार विद्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या...

यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल,व बाल संस्कार विद्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी.

यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल,व बाल संस्कार विद्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी.

यावल दि.१०  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज गुरुवार दि. १० जुलै २०२५ रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन, इंग्लिश स्कूल, आणि बाल संस्कार विद्या मंदिरात गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रंजना महाजन मॅम होत्या तसेच इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या दिपाली धांडे मॅम यांनी व्यास मुनीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात केली या कार्यक्रमानिमित्त शाळेच्या शिक्षिका कविता पाटील आणि गायत्री चौधरी मॅम यांनी मुलांना गुरुपौर्णिमे विषयी माहिती सांगितली,तसेच इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपापली बोलण्याचे कौशल्य दाखविली.
कार्यक्रमाच्या शेवटी आदरणीय मुख्याध्यापिका दिपाली धांडे मॅम यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सरोज येवले मॅम यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका रेश्मा पाटील मॅम यांनी केले
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेत कर्मचायांनी सहकार्य केले.

याचप्रमाणे येथील बाल संस्कार विद्या मंदिरात इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील एकूण २६ विद्यार्थ्यांनी गुरु महिमा,आईवडील व श्री व्यास महर्षी यांच्या बद्दल भाषणातून माहिती दिली. शाळेतील सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.ऋण व्यक्त केले. आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी व यशस्वी बनवण्यामध्ये गुरूंचे व आई-वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे याबद्दल उदाहरणासह मराठी,इंग्रजी, संस्कृत व हिंदी इत्यादी भाषांमध्ये भाषणे दिली.सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे वकृत्व शैले वृद्धिंगत करण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री राजेंद्र फालक सर यांनी विद्यार्थ्यांना पेन भेट दिलेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर यांच्या हस्ते सरस्वती व श्री महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत महाजन सर तर चित्रीकरण अतुल पवार सर,चेतन चौधरी सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या