Friday, May 1, 2026
Homeगुन्हायावल तालुक्यात सुद्धा गुन्हेगारीचा वाढता प्रभाव.

यावल तालुक्यात सुद्धा गुन्हेगारीचा वाढता प्रभाव.

यावल तालुक्यात सुद्धा गुन्हेगारीचा वाढता प्रभाव.

राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या हॉटेल व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने गुन्हा दाखल.

यावल दि.११       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         बऱ्हाणपूर – अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्याच्या जवळ बियरबार परमिट रूम चालकाने बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने मालकावरच थेट गोळ्या झाडल्याची घटना दि.१० गुरुवारी रात्री घडल्याने यावल तालुक्यात सुद्धा गुन्हेगारीचा प्रभाव वाढत जात असल्याचे चित्र निर्माण झाल्याने पोलिसांच्या गोपनीय विभागाला फार मोठे आव्हान आहे.या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की चिंचोली गावाजवळ तथा बऱ्हाणपूर- अंकलेश्वर आणि यावल चोपडा रोडला लागून असलेल्या हॉटेल रायबा परमिट रूम बियर बार येथे बियर घेण्यासाठी दुचाकी वर आलेल्यानी गोळीबार केल्याने दोघांचा शोध पोलीस घेत आहे. या घटनास्थळी रात्रीच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक हे पाहण्यासाठी दाखल झाले होते.तर शुक्रवारी डीवायएसपी यांनी यावल पोलीस निरीक्षकांसह धानोरा- किनगाव या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व पाहणी केली तर या घटनेतील जखमी हॉटेल मालकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
चिंचोली जवळ आडगाव फाट्याजवळ हॉटेल रायबा आहे. या हॉटेलवर गुरुवारी ९ नऊ वाजेच्या सुमारास दुचाकी वर २ जण आले होते.त्यापैकी १ जण दुचाकी खाली उतरून हॉटेल बंद करून खाजगी वाहनात किनगाव कडे निघत असलेले हॉटेल रायबाचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर वय ४० रा.पुनगाव ता.चोपडा, हल्ली मुक्काम चंदू अण्णा नगर जळगाव, हे त्यांच्या कार क्रमांक एम.एच.१९ सी.एफ. ३३५३ मध्ये होते व त्यांच्या बाजूला त्यांचे मित्र रतन रमेश वानखेडे वय ४२ रा.किनगाव खुर्द हे होते.तेव्हा दुचाकीच्या खाली उतरून त्यांच्या कारजवळ एक अनोळखी तरुण आला व त्याने सांगितले की मला बियर पाहिजे आहे. त्याला सांगितले की हॉटेल बंद आहे.तुला जर बियर पाहिजे असेल तर किनगाव येथे जा.तेव्हा असे बोलल्यामुळे राग आल्याने त्या अनोळखी इसमाने आपल्याजवळून एक पिस्तोल काढले आणि प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या

 

Oplus_131072

झाडल्या.एक त्याच्या छातीत लागली तर एक त्याच्या उजव्या खांद्याजवळ लागली आणि गोळी झाडून दोघेही किनगावच्या दिशेने दुचाकीद्वारे फरार झाले.जखमी अवस्थेत बाविस्कर यांना तातडीने जळगावला दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.व त्यांनी पाहणी केली होती व दवाखान्यात जाऊन देखील या जखमी हॉटेल मालकाची त्यांनी पाहणी केली तर याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला रतन वानखेडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी डिवायएसपी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी धानोरा तसेच किनगाव येथील मुख्य राज्य मार्गावर असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आहे.आरोपीच्या शोधाच्या दृष्टिकोनातून सदर सीसीटीव्ही फुटेज उपयोगी पडणार आहेत या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे,पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख,हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.
यावल तालुक्यात फैजपूर,अकलूद या ठिकाणी सुद्धा गोळीबार संदर्भात घटना घडलेल्या आहेत.

चिंचोली जवळ घटना घडल्याने अवैध धंद्यांमध्ये कोण कोणाचे समर्थक आहेत आणि घटना कशामुळे घडता आहे.? हॉटेल व्यवसायिकांशी अवैध धंदे चालकांसोबत पोलीस खात्यातील काही एक दोन कर्मचाऱ्यांचे सलोख्याचे हितसंबंध सुद्धा आहेत का..? किनगाव जवळ एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेमुळे त्या ठिकाणी सुरू असलेला गैरप्रकार त्या पोलिसाला माहीत नव्हता का..? याचा शोध घेणे यावल गोपनीय विभागाला मोठे आव्हान आहे. इत्यादी अवैध धंद्यांबाबत सुद्धा यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या