सेऊल दक्षिण कोरिया येथे आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रा डॉ सुनील नेवे रवाना.
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेच्या वतीने दिनांक 12 जुलै ते 16 जुलै 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय जागतिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे हे नुकतेच दक्षिण कोरिया येथील सेऊल येथे रवाना झाले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये “दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण: सध्याच्या परिस्थितीत भारत पाकिस्तान आणि बांगलादेश चे तुलनात्मक विश्लेषण” या विषयावर सुनील नेवे हे शोधनिबंध सादर करणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जगातील विविध देशातील राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करणारे अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी दक्षिण आशियामध्ये विशेषतः भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये राजकीय ध्रुवीकरण हा एक कसा महत्त्वाचा मुद्दा आहे हे आपल्या शोधनिबंधात स्पष्ट केलेले आहे. राजकीय ध्रुवीकरण हे भारत पाकिस्तान आणि बांगलादेश समोर एक गंभीर आव्हान आहे .
या ध्रुवीकरणाला कारणीभूत असलेले घटक या तीनही देशांमध्ये वेगवेगळे असू शकतात,परंतु शासन आणि लोकशाहीचे परिणाम समान आहेत.ध्रुवीकरणाला तोंड देण्यासाठी व्यापक आणि शाश्वत प्रयत्नांची आवश्यकता आहे. ज्यामध्ये संवादाला चालना देणे,लोकशाही संस्थांना बळकटी देणे,सामाजिक आणि आर्थिक घटकांना संबोधित करणे ही पावले उचलून ध्रुवीकरणाचे नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात. आणि या तीनही राष्ट्रांसाठी अधिक शांततापूर्ण न्याय आणि समृद्ध भविष्य निर्माण करणे शक्य आहे असे या शोधनिबंधात नेवे यांनी स्पष्ट केलेले आहे. भारतात राजकीय ध्रुवीकरण हे दीर्घ काळापासून एक महत्त्वाचा घटक राहिलेले आहे .अलीकडच्या काळात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यासारख्या विरोधी पक्षांमधील दरी सातत्याने वाढत आहे, धार्मिक तणाव आर्थिक विषमता, आणि सामाजिक फूट यांसह अनेक घटकांमुळे हे ध्रुवीकरण वाढले आहे.भारतातील राजकीय ध्रुवीकरण कायम ठेवण्यात सोशल मीडियाची भूमिका अधोरेखित आहे.
सोशल मीडियावरील चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांचा प्रसार यामुळे राजकीय ध्रुवीकरण अधिक कठीण झालेले आहे . पाकिस्तान मध्ये राजकीय ध्रुवीकरण एक महत्त्वाचे आव्हान हे ध्रुवीकरण अनेक घटकांमुळे चालले आहे ज्यामध्ये देशाचा लष्करी राजवटीचा इतिहास वार्षिक तणाव आणि प्रादेशिक स्पर्धा यांचा समावेश आहे यामुळे पाकिस्तानातील लोकशाही प्रगतीच्या मधील अडथळा ठरत आहे .याशिवाय सशस्त्र दल अनेकदा त्यांचे हितसंबंध वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप करतात. बांगलादेशमध्ये देशातील राजकीय हिंसाचार निवडणूक फसवणूक आणि हुकूमशाही राजवटीचा इतिहास समाविष्ट आहे.
या राजकीय ध्रुवीकरणामुळे बांगलादेशमध्ये लोकशाही आणि आर्थिक विकासाची प्रगती रोखली गेली आहे.त्यामुळे अस्थिरता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे भारतामधील लोकशाही जगातील उत्कृष्ट लोकशाही असलेल्या देशांपैकी एक आहे भारताने राजकीय ध्रुवीकरण टळावे याकरता धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा स्वीकार केला. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक लोकशाहीला महत्त्व देण्यात आले व याचे श्रेय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देता येईल. पाकिस्तान आणि बांगलादेश या देशाची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली. दक्षिण आशियातील व्यापक ध्रुवीकरणाला तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे.विविध गटांमध्ये संवाद सलोखा आणि समजूतदारपणा वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे लोकशाही संस्थांना बळकटी देणे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करणे आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे .गरीबी बेरोजगारी आणि भेदभाव यांसारख्या सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे तितकेच महत्त्वाचे आहे . दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण हा एक जटील आणि बहुआयामी मुद्दा आहे .असे निष्कर्ष या शोधिबंधातून प्रा. नेवे यांनी काढलेले आहे.दिनांक 15 जुलै 2025 मंगळवार रोजी सदर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रा.सुनील नेवे मांडणार आहेत.