Thursday, April 30, 2026
Homeगुन्हावरणगाव परिसरात अवैध गौण खनिज वाहतुक करणारे वाहने पकडली

वरणगाव परिसरात अवैध गौण खनिज वाहतुक करणारे वाहने पकडली

वरणगाव परिसरात अवैध गौण खनिज वाहतुक करणारे वाहने पकडली
महसुल प्रशासनाची कारवाई

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ क्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. सदरची मोहीम मंडळ अधिकारी श्रीमती रजनी तायडे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी सौ. सुप्रिया बिराजदार, रेणुका पाटील, नितीन केले, रोशन कापसे आणि जितेश चौधरी यांच्या पथकाने केली आहे .

तपासणी दरम्यान नागेश्वर मंदिर परिसर, चौफुलीजवळ, विल्हाळे गावाच्या दिशेने वरणगावकडे येत असताना अवैध मुरूम वाहतूक करणारी वाहने आढळून आली.

विष्णू भानुदास गाजरे (रा. आचेगाव) यांचे ट्रॅक्टर (MH 19 EA 4246) — अंदाजे १ ब्रास मुरूम

आकाश संजय पाटील (रा. दर्यापूर) यांचे ट्रॅक्टर (MH 10 Z 4835) — अंदाजे २ ब्रास मुरूम

विना क्रमांकाचे जेसीबी — कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे चौकशी कामी जप्त

डंपर (MH 19 CY 0066) — अंदाजे ४ ब्रास डबर, मालक राजेंद्र सिंग किशनवत आदी वाहने ताब्यात घेण्यात आले आहे
सदर वाहनचालकांकडे मुरूम वाहतुकीचे कोणतेही वैध परवाने अथवा पावत्या नसल्यामुळे सर्व वाहने व खनिज जप्त करून पंचनामा करण्यात आला.
काही वाहनचालकांनी सहकार्य न केल्यामुळे पोलिस व प्रशासनाच्या मदतीने वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली.

अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अशा मोहिमा नियमित राबविण्यात येतील, असे तहसीलदार नीता लबडे सांगितले.
माहे जुलै महिन्यात भुसावळ महसूल प्रशासनाचे अवैध गौण खनिजाबाबत दुसरी सर्वात मोठी कामगिरी आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या