Sunday, July 20, 2025
Homeजळगावशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शिक्षकांना ड्रेस कोड लागू करावा : आकाश चोपडे...

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शिक्षकांना ड्रेस कोड लागू करावा : आकाश चोपडे यांची मागणी.

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शिक्षकांना ड्रेस कोड लागू करावा : आकाश चोपडे यांची मागणी.

यावल दि.१४  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांना ड्रेस कोड लागू करून प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष आकाश चोपडे यांनी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती यावल यांच्याकडे केली.
दि.१४ जुलै २०२५ रोजी यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बाबत आर्थिक तरतूद करून वर्षाचा कालावधी लोटला गेला तरी अद्याप पावतो तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे शाळेत बसविण्याचे दिसून आले नाही तरी लहान मुलांच्या सुरक्षेचे दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कारवाई पंधरा दिवसात करावी. तसेच तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना शासन निर्देशाप्रमाणे ड्रेस कोड निश्चित करून दिल्यास शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिस्त लागेल तरी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश चोपडे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील,शहराध्यक्ष योगेश पाटील,,, महिला शहराध्यक्ष योगिता घोडके, गोलू महाजन,बंटी बारी,प्रेम देवरे, राहुल महाजन इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या