जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बैलगाय यासारख्या जनावरांवर येणाऱ्या लंपी आजारावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी.
ॲड. रोहिणी खडसे
यावल दि.२० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मुक्ताईनगर मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बैल,गाय यासारख्या जनावरांवर येणाऱ्या लंपी या आजारावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी ॲड. रोहिणी खडसे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.१७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर तालुक्यात लंपी
आजाराने ग्रस्त जनावरे झाली आहेत त्याची लागण मुक्ताईनगर मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यात पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे जळगांव जिल्ह्यासह मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी याबाबत आपल्या गाय,
बैल,वासरू इत्यादी जनावराबाबत चिंताग्रस्त झाली आहे तरी लंपी आजाराच्या प्रतिबंध बंदोबस्त व्हावा म्हणून संभाव्य उपाययोजना करत असतांना पुरेसा आवश्यक औषध साठा,आरोग्य तपासणी मोहीम,प्रभावित जनावरांचे विलगीकरण,सार्वजनिक पाणवठे (हौद) याबाबत जनजागृती करण्यात यावी.तसेच मागील दोन वर्षापुर्वी आलेल्या लंपी आजारातुन जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी सरकारी डॉ.सोबत खाजगी पशुवैदक पदविका धारक डॉक्टर यांनी मोठया प्रमाणात आजार आटोक्यात येईपर्यंत
‘पशुसेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतुन वेळ देवून मोफत सेवा देण्याचे काम केले.त्यांनी केलेल्या श्रमापोटी मानधन स्वरुपामध्ये राज्य शासनाने त्यांना या आपत्ती दरम्यान मोबदला न दिल्याचे आढळून आले असून त्यांना
तात्काळ लाभ द्यावा. शासन स्तरावर लंपी आजार हा नैसर्गीक आपत्ती NDRF या धरतीवरील उपाययोजनेमधून गाय,बैल
मृत्युमुखी पडल्यास मोबदला शेतकऱ्यांना मिळावा.सदर आजार आटोक्यात आणन्यासाठी लागणारा प्रशिक्षीत,खाजगी पशुवैदक,पदविकाधारक यांना शासन सेवेत नेमणुका देण्यात याव्या,अशी मागणी ॲड.रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.