नगरपरिषद अधिकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात.ॲड.रितेश बारी.
कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार कायदेशीर दणका.
यावल दि.२१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल न्यायालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यावल नगरपालिका कार्यालयात कार्यालयातील मुख्याधिकारी आणि इतर काही अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत आपल्या खुर्चीवर आढळून येत नसल्याची लेखी तक्रार यावल येथील ॲड.रितेश बारी यांनी केली असल्याने संबंधितांनी या तक्रारीची दखल न घेतल्यास यावल नगरपालिकेच्या त्या काही अधिकारी,कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कारवाईचा दणका बसणार असल्याची यावल शहरात चर्चा आहे.
ॲड.रितेश बारी यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.१७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कायदेशीर कामासाठी नगरपालिका कार्यालयात संबंधित नियुक्त कर्मचारी किंवा अधिकारी यांना भेटण्यास गेलो असता स्वच्छता निरीक्षक व आरोग्य व्यवस्थापक हे नगरपरिषद यावल येथे दुपारी चार वाजता कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे हालचाल तथा नोंदवहीची माहिती घेतली असता कोणत्याही कर्मचाऱ्यांने हालचाल रजिस्टर किंवा नोंद रजिस्टर मला उपलब्ध करून दिले नाही.
ॲड.रितेश बारी हे नगरपालिकेत गेले असता नगरपरिषद कर्मचारी विरेंद्र गोपाल घारू याची
विचारणा केला परंतु वीरेंद्र धारू यांनी कार्यालयातील नोंद वहीत नमूद न करता कुठे व कोणत्या ठिकाणी कोणत्या कामानिमित्त गेले याची नोंद केलेली नाही अशी विचारणा केली असता वीरेंद्र दारू हे नगरपालिका कार्यालयात उपस्थित झाले असता त्यांना माझ्या परिसरातील अडचणींची समस्यांची माहिती दिली त्यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यालयात मला उद्धटपणाची अरेरावीची भाषा वापरून तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या माझे कोणीही काही वाईट करू शकत नाही, सर्व अधिकारी हे माझ्या कार्यालयातील हित संबंधाचे असून ते माझे काही करू शकत नाही.अशाप्रकारे नगरपरिषद कार्यालयात उद्धटपणाची वागणूक दिली म्हणून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ॲड.रितेश बारी यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हे सुद्धा बऱ्याच वेळेला कार्यालयीन वेळेत उपस्थित राहात नसतात त्याचप्रमाणे कार्यालयीन इतर जबाबदार कर्मचारी सुद्धा कार्यालयीन वेळेत अनेक वेळेला वेळेवर उपस्थित राहत नसल्याने अनेकांच्या तक्रारी आहेत.याबाबत यावल नगरपरिषद प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी यावल नगरपालिका कार्यालयात कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांचे हालचाल रजिस्टर मध्ये कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नोंदी दैनंदिन वेळेवर नोंद करण्याबाबत सूचना आदेश करावेत अशी मागणी होत आहे.