शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दि.२४ जुलै २०२५ रोजी चक्काजाम आंदोलन करणार.
यावल दि.२१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल येथे दि.२४ जुलै २०२५ रोजी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहे त्याबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावल तहसीलदार, यावल पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,शेतकरी कर्जमाफीसह अन्य महत्वाच्या मागणीसाठी मागील काही
दिवसापासुन मा.आमदार बच्चु भाउ कडु महाराष्ट्रातले शेतकरी, कष्टकरी,दिव्याग,विधवा,मेंढपाळ,
ग्रामपंचायत कर्मचारी अन्य वंचित घटकासाठी आंदोलन करीत आहे यांच आंदोलनाचा एक भाग म्हणुन यावल येथे २४ जुलै २०२५ रोजी भुसावळ टी पॉइंटवर चक्का जाम आंदोलन करणार आहे.याकडे केंद्र व राज्य सरकारने तातडीने व गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आमची आग्रही मागणी आहे
आंदोलनातील मागण्या केवळ राजकीय नव्हे सामाजिक न्यायाशी निगडित आहे जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले तर हे लोकशाही मार्गाने व्यापक प्रमाणावर उफाळून येईल आणी त्यास शासन जबाबदार असेल.
यावल तहसीलदार यांना निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल तालुका अध्यक्ष हरीभाऊ विजय पाटील,ललित पाटील, दहिगांव,दिलीपभाऊ आमोदेकर, प्रतिक पाटील नायगांव,लोटन जयकर दहिगांव,बंटी पाटील दहिगांव,पवन पाटील दहिगांव,
समाधान पाटील दहिगांव,किरण माळी दहिगांव,निंबाजी पाटील दहिगांव,हरीलाल अलकरी शिरसाड,समाधान डुबोले यावल, रामदास पाटील कठोरा,कमलाकर झोपे कठोरा,बाळू रावजी कठोरा, न्हावीभाऊ कठोरा,यादव राणे कठोरा,खेमा बेंडाळे कठोरा, घनश्याम फिरके बामणोद,ललित फिरके बामणोद,नाना विरावली, संतोष पाटील आसनखेडा,बारेला यावल,रेखा चौधरी यावल,मिना देशमुख इत्यादी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.