यावल पंचायत समिती सोयीनुसार, गरजेनुसार देते जन्म- मृत्यूचे दाखले.

अनेक जुने दस्तऐवज गहाळ करून बेकायदा नोंदी..?
यावल दि.२१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल पंचायत समिती कार्यालया मार्फत विविध योजना राबविताना, धनादेश काढताना लाभार्थ्यांची पिळवणूक आणि आर्थिक लुबाडणूक कशी केली जाते आणि पंचायत समिती मार्फत जन्म मृत्यूचे दाखले जे दिले जात आहे ते पंचायत समिती मधील एक कर्मचारी आपल्या सोयीनुसार, दाखले घेणाऱ्याच्या गरजेनुसार आर्थिक लाभ होण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवून अनेक दाखले देत असल्याची तालुक्यात चर्चा आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आमदार अमोलदादा जावळे यांच्या गावापासून पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील एका गावात आणि इतर अनेक ठिकाणी अनेकांना गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत अनेक बेकायदा बोगस जन्म- मृत्यूच्या मागील वर्षाच्या जुन्या रेकॉर्डमध्ये बोगस नोंदी नोंदवून आर्थिक फायदा घेऊन जन्म मृत्यूचे दाखले देण्याचे षडयंत्र सुरू असल्याची दबक्या आवाजात यावल तालुक्यात चर्चा आहे.
शासकीय किंवा अधिकृत कार्यालयात कंपनीत नोकरी लागल्यानंतर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची कागदपत्र पडताळणी करण्यासाठी जुन्या नोंदी जन्ममृत्यू नोंदी आवश्यक असतात यामुळे यावल पंचायत समिती मधील जुन्या रेकॉर्डमध्ये सोयीनुसार काही नोंदी नोंद करून त्यावर खडू किंवा इतर अत्याधुनिक साहित्य फिरवून जुनी नोंद असल्याचे बेकायदा नोंद करण्यात येत आहे. यावल पंचायत समिती मधील जन्ममृत्यूच्या जुन्या नोंदी रेकॉर्ड रजिस्टर कोणकोणते गहाळ झाले आहे आणि कोणत्या रेकॉर्ड मध्ये नवीन नावाने जन्ममृत्यूच्या नोंदी झाल्या आहेत याची चौकशी जिल्हा परिषद कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत झाल्यास यावल तालुक्यात अनेकांना जन्म मृत्यूचे बोगस टाकले दिले असल्याचे समोर येईल. जन्ममृत्यूचे दाखले मिळवून देण्यासाठी तालुक्यातील चार ते पाच जणांचे रॅकेट सक्रिय असल्याने यांच्याजवळ महागडे नवीन चार चाकी वाहन सुद्धा असल्याने त्यांनी ते रोग स्वरूपात घेतले आहे का..? किव्वा त्या वाहनाचा ईएमआय आणि कुठून भरला जातो..? वाहन घेताना आपल्या वरिष्ठाची परवानगी घेऊन आयकर विभागाकडे कसे विवरणपत्र भरले आहे का..? खाजगी मध्यस्थी दलाल कोण कोण आहेत त्यांच्या नावासह संपूर्ण यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

