मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावल येथे १२८ जणांचे रक्तदान.

यावल दि.२१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावल- रावेरचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी यावल मंडळ कडून यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित केले होते,सदर रक्तदान शिबीराला १२८ दात्यांनी रक्तदान करून उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. रक्तदान कार्यक्रमावरील तालुक्यातील भाजपाचे डॉक्टर कुंदन फेगडे,मेडिकल असोसिएशन प्रमुख नितीन महाजन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती मंडळ अध्यक्ष सागरभाऊ कोळी यांनी दिली.

