Monday, July 21, 2025
Homeजळगावबस स्थानकाच्या आवारात अज्ञात व्यक्तीने गळफास घेत केली आत्महत्या!

बस स्थानकाच्या आवारात अज्ञात व्यक्तीने गळफास घेत केली आत्महत्या!

बस स्थानकाच्या आवारात अज्ञात व्यक्तीने गळफास घेत केली आत्महत्या!

पारोळा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील बस स्थानकाच्या आवारात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना दि. १९ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. शहरातील बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला कोणीतरी अज्ञात इसमाने साधारण (वय-३०) याने सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना पहाटे सहा वाजेच्या सुमारास पेपर विक्रेता निंबा मराठे यांच्या लक्षात आले. याबाबत घटनास्थळी चौकशी केली असता मयताजवळ कुठल्याही प्रकारचे आय कार्ड अथवा रहिवासी पत्ता सापडला नव्हता, रात्री उशिरापर्यंत मयताची ओळख पटलेली नव्हती, ज्याबाबत येथील सुरक्षारक्षक चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या