Monday, July 21, 2025
Homeगुन्हाआपल्याकडे पाहून बोलत असल्याच्या संशयावरून १७ वर्षीय मुलाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण...

आपल्याकडे पाहून बोलत असल्याच्या संशयावरून १७ वर्षीय मुलाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण !

आपल्याकडे पाहून बोलत असल्याच्या संशयावरून १७ वर्षीय मुलाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आपल्याकडे पाहून बोलत असल्याच्या संशयावरून १७ वर्षीय मुलाला शिवीगाळ व मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना रात्री ९.३० वाजता तांबापूरा येथे घडली आहे. याबाबत शनिवारी १९ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,आशाबाई मधुकर शेटे (वय ४२) या महिला तांबापूरा या भागात आपल्या मुलासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी १८ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता महिलेचा मुलगा चेतन मधुकर शेटे आणि नणंद दुर्गाबाई बाळू शिंदे हे दोघेजण बोलत होते. यावेळी आपल्याकडून पाहून बोलत असल्याचे संशय घेवून तांबापूरा भागात राहणारे भुऱ्या, अरबाज यूनूस तडवी आणि इतर अनोळखी २ मुले यांनी मुलगा चेतन शेटे याला मारहाण केली. मुलाला मारहाण करत असल्याचे पाहून त्याची आई आशाबाई आणि दुर्गाबाई यांनी धाव घेतली. त्यावेळी दोघांना धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर आशाबाई शेटे यांनी एमआयडीसी पोलीसात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात भुऱ्या, अरबाज यूनूस तडवी आणि इतर अनोळखी २ मुले यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या