Friday, May 1, 2026
Homeजळगावरेशनचा तांदूळ लाभार्थी करतात विक्री!

रेशनचा तांदूळ लाभार्थी करतात विक्री!

रेशनचा तांदूळ लाभार्थी करतात विक्री…घेणारा गब्बर व्यापारी रावेरचा कोण..?

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेशन दुकानातील तांदूळ आणि पोषण आहाराचे पॅकेट लाभार्थी सर्रासपणे खुलेआम विक्री करीत असल्याचे समोर आले असून काही तरुणांनी रेशन तांदुळाची आणि पोषण आहार पॅकेट खरेदी घेणाऱ्या दोन रिक्षा सरळ तहसील कार्यालयात नेल्याने यावल शहरात मोठा गोंधळ उडाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,शासनातर्फे स्वस्त धान्य दुकानातून पात्र लाभार्थ्यांना तांदूळ गहू मोफत मिळत असल्याने तसेच ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्रात व इतर ठिकाणी पोषण आहाराचे विविध खाद्य वस्तूचे पॅकेट मोफत मिळतात लाभार्थी मोफत मिळालेला तांदूळ आणि पोषण आहाराचे पॅकेट सरळ बाजारात विक्री करीत आहे.रेशनचा तांदूळ दहा रुपये किलोने खरेदी केला जात असून रिक्षा चालक म्हणतात आम्ही हा खरेदी केलेला तांदूळ रावेर येथील एका व्यापाऱ्याला पोहोच करून २० ते २५ रुपये दराने विक्री करीत आहे. लाभार्थ्याकडून बाजारभावात सर्रासपणे दहा रुपये किलोने तांदूळ विक्री केला जात आहे,पात्र लाभार्थी कदापी असा तांदूळ विक्री करू शकत नाही,जे बोगस अपात्र लाभार्थी आहे तेच रेशनचा तांदूळ घरात न खाता बाजारात विक्री करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.प्रत्येक गावातून रेशनचा तांदूळ दहा रुपये दराने खरेदी करणारे मोठे रॅकेट असून हा खरेदी केलेला तांदूळ रावेर येथील एक व्यापारी २० ते २५ रुपये दराने खरेदी करीत असल्याची माहिती त्या रिक्षा चालकांकडून मिळाली आहे, तो व्यापारी कोण..? याबाबत यावल महसूल व पोलीस विभागाने संयुक्तिक कारवाई करून यामागील खरे सूत्रधार कोण आहेत याचा तपास करून योग्य ती कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.दहा रुपये किलोने तांदूळ खरेदी केलेल्या दोन रिक्षा तहसील आवारापर्यंत गेल्या असल्या तरी त्यांच्यावर तांदूळ घेणाऱ्यांवर कारवाई काय.? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या