Monday, July 6, 2026
Homeजळगावखळबळ : अनोळखी महिलेस ठार मारुन नदीपात्रात फेकले !

खळबळ : अनोळखी महिलेस ठार मारुन नदीपात्रात फेकले !

खळबळ : अनोळखी महिलेस ठार मारुन नदीपात्रात फेकले !

Oplus_131072

<img class

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील निंभोरा सिम जवळील पिंप्रीनांदु पुलाजवळ ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला आहे. या महिलेची ओळख पटली नसून कुणीतरी बांधून तिला पाण्यात फेकल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, रावेर तालुक्यातील निंभोरा सिम गावाजवळील पिंपरी नांदू पुलाजवळ २४ रोजी सकाळी ७ वाजेपूर्वी नदीपात्रात एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. या मृतदेहास धुरखेडा येथील पोहणाऱ्या बेलदार बांधवांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर पिंपरी नांदूच्या शिवारातील नदी काठावर मृतदेह आणला. हा मृतदेह अनोळखी महिलाचा असून या महिलेचे वय ३० ते ३५ वर्षांचे आहे. या महिलेने लाल गुलाबी रंगाचा पंजाबी कुर्ता व लाल गुलाबी रंगाची लेगीज परिधान केलेली आ हे. तर गळ्याभोवती पांढरा रंगाची ओढणी गुंडाळलेली होती. या महिलेचे डोळे व जीभ बाहेर आली आहे. या महिलेचे उजव्या हाताच्या मनगटाजवळ व दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते. तर दोरीचा एक भाग खुणा दर्शवण्याकरता लावण्यात येणाऱ्या सिमेंटच्या खांबाला बांधल्याचे दिसून आले. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आहे.

दरम्यान, रावेर येथील जागेवरच त्या महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात पो.ना. सुरेश पवार यांनी खबर दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आ-हे. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी घोलप यांच्या मार्गदर्शनात निंभोरा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. हरीदास बोचरे व पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या महिलेची ओळख पटवण्यासाठी निंभोरा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन स.पो.नि. हरिदास बोचरे व फौजदार अभय ढाकणे, महिला फौजदार दीपाली पाटील, महिला फौजदार ममता तडवी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या