Monday, July 6, 2026
Homeगुन्हागुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आले...

गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आले समोर !

गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आले समोर !

Oplus_131072

<img class

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – विक्रीसाठी परराज्यातून आणून साठवून ठेवलेल्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर अन्न व औषध प्रशासन विभागाने शनिपेठ परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत ६१ हजार ६६४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला शनिपेठ परिसरातील गंगुबाई शाळेजवळील एका घरात विक्रीसाठी प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू आणि सुगंधित सुपारीचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अमोल कैलास जगताप यांनी शनिपेठ पोलिसांची मदत मागितली. त्यावरून पोलिस निरीक्षक विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल काजोल सोनवणे यांच्यासह पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली.दि. २९ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान पथकाला पाहताच संबंधित साठेबाजांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पथकाने घरातील महिलांकडून माहिती घेत घराची तपासणी केली असता, तेथून प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि अन्य तत्सम पदार्थांचा एकूण ६१ हजार ६६४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमोल जगताप यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिजवान चाहत अली, रिहान चाहत अली आणि चाहत अली (सर्व रा. गंगुबाई शाळेजवळ, शनिपेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.दरम्यान, या कारवाईत अन्य राज्यातून पानमसाला आणि तंबाखूची चोरटी वाहतूक करून जळगाव शहरात पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नावही समोर आले आहे. यासंदर्भात फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, संबंधित पुरवठादाराचा शोध घेऊन त्याच्यावरही कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या