Friday, August 1, 2025
Homeगुन्हाखळबळजनक : शहरातील डॉक्टरला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटींची...

खळबळजनक : शहरातील डॉक्टरला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटींची मागणी !

खळबळजनक : शहरातील डॉक्टरला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २ कोटींची मागणी !

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पाचोरा येथील एका डॉक्टरला अश्लील व्हिडीओ फोटो व्हायरल करण्याची निनावी चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली असून त्यासाठी २ कोटींची मागणी करण्यात आल्याने त्या डॉक्टरने पोलिसात धाव घेतली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, एका शहरातील डॉक्टरला चार दिवसांपूर्वी दोन वेळेस निनावी चिठ्ठयाद्वारे कारनामे उघड करण्याची तसेच दोन कोटी दे अन्यथा अश्लील व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच एका सहकाऱ्याच्या मोबाईलवरदेखील याप्रकरणी हस्तक्षेप करू नको, असा मेसेज आला. यामुळे वैतागलेल्या त्या डॉक्टरने पाचोरा पोलिसांत अज्ञाताविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप त्या धमकी देणाऱ्याचा शोध लागला नाही. त्या चिठठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत तर मोबाइल नंबरचा शोध सुरू आहे. मोबाइल नंबरचा तपास लागल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे. याबाबतचा अधिक तपास पाचोरा पोलिस करत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या