Friday, August 1, 2025
Homeगुन्हाऔद्योगिक क्षेत्राजवळ अनियंत्रित ब्लास्टिंगची तक्रार असल्याने ती सुनावणी आता दि. ८ रोजी...

औद्योगिक क्षेत्राजवळ अनियंत्रित ब्लास्टिंगची तक्रार असल्याने ती सुनावणी आता दि. ८ रोजी होणार.

औद्योगिक क्षेत्राजवळ अनियंत्रित ब्लास्टिंगची तक्रार असल्याने ती सुनावणी आता दि. ८ रोजी होणार.

भुसावळ दिनांक १. सुरेश पाटील
भुसावळ तालुक्यात भुसावळ किन्ही औद्योगिक क्षेत्राजवळ मोठ्या प्रमाणात अनियंत्रित ब्लास्टिंग होत असल्याची तक्रार भुसावळ भाग भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे दाखल झाल्याने आज शुक्रवार १ ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी होणार होती परंतु प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना शासकीय काम अचानक निघाल्याने आजची सुनावणी आता दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी रोजी होणार असल्याने ब्लास्टिंग करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत भुसावळ भाग भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडून दि.१८ जुलै २०२५ रोजी नोटीस काढण्यात आली होती दिलेल्या नोटीस मधील महत्त्वाचा विषय लक्षात घेतला असता आजची तारीख शासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून ती सुनावणी आता ८ रोजी होणार आहे.
महाराष्ट्र विकास महामंडळाने विकसित केलेल्या भुसावळ किन्ही औद्योगिक क्षेत्राजवळ मोठ्या प्रमाणात अनियंत्रित ब्लास्टिंग होत आहे सदरील ब्लास्टिंगची तीव्रता ही जास्त असल्यामुळे व भूकंपनामुळे औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या बऱ्याच खाजगी आस्थापनांच्या इमारतींना व स्थावर मालमत्तांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे,याबाबत अर्जदार अश्विनकुमार परदेशी अध्यक्ष इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर असोसिएशन भुसावळ व इतर ६ यांनी सामनेवाला जीवन चंद्रकांत पाटील इतर दोन यांच्याविरुद्ध ( भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १५२ अन्वये ) कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार गंभीर स्वरूपाची असल्याने तसेच सुनावणी पुढे ढकलली गेल्यामुळे संबंधितांमध्ये मोठी खळबळ उडाली असून याकडे संपूर्ण भुसावळ विभागाचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या