Friday, August 1, 2025
Homeकृषीआमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून रावेरमध्ये केळी तंत्रज्ञान केंद्र स्थापनेसाठी तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण...

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून रावेरमध्ये केळी तंत्रज्ञान केंद्र स्थापनेसाठी तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक.

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून रावेरमध्ये केळी तंत्रज्ञान केंद्र स्थापनेसाठी तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक.

यावल दि.१. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्तावित केळी तंत्रज्ञान प्रसार केंद्र स्थापने संदर्भात भालोद येथे केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.अरुण भोसले,कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद (जळगाव) चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.हेमंत बाहेती तसेच तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.दीपक दहात यांनी भेट देऊन या केंद्राच्या कार्यपद्धती, गरज आणि उद्दिष्टांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीत केळी पिकावरील पनामा रोग,त्यावरील उपाययोजना, भविष्यातील संशोधनाची दिशा आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आधारित मार्गदर्शन कसे देता येईल,यावर विशेष भर देण्यात आला.याशिवाय आधुनिक शेती प्रयोग,पीक सल्ला,बियाणे निर्मिती, तसेच शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही सखोल चर्चा करण्यात आली.

यावल येथील खरेदी-विक्री संघाच्या परिसरात महिन्यातील एका गुरुवारी कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत “शेतकरी संवाद कार्यक्रम”आयोजित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना विविध पिकांवरील सल्ला,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि समस्यांवरील उपाय यांचे सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश रावेर मतदारसंघातील केळी उत्पादकांना वैज्ञानिक माहिती सहज उपलब्ध करून देणे,उत्पादन वाढीस चालना देणे,आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेती अधिक परिणामकारक बनविणे हा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या