कन्हाळा येथील १६ वर्षीय तरुणाचे अपहरण करून खडका येथील टोळी कडून अमानुष मारहाण
भुसावळ खानदेश ला इंग्लिश प्रतिनिधी तरुणाची प्रकृती चिंताजनक; गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर कारवाईची कन्हाळा सरपंचांकडून मागणी
भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावातील अवघ्या १६ वर्षीय निसार युनुस गवळी या तरुणाचे खडका येथील गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अपहरण करून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे .
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाला खडका काही व्यक्तींनी परिसरातील किंग हाटेल समोर मारहाण करून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नेले आणि खडका परिसरात झाडा झुडूपात नेऊन चामडी पट्टा व फायटरने बेदम मारहाण केली. या घटनेतील गंभीर जखमी अवस्थेत युनुस यास उपचारासाठी भुसावळ येथील विघनहर्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यास व मेंदूला व छातीवर मारहाण झालेली आहे .
या घटनेनंतर कन्हाळा येथील सरपंच मोहम्मद गवळी यांनी संताप व्यक्त करत संबंधित खडका येथील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मारहाण करणारे सपकाळे व अडकमोल नावाचे तरूण असल्याचे संरपंच यांनी सांगितले .तसेच, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशीही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. घटनेचे सीसी टिव्ही फुटेज प्रशासना पर्यंत पोहचले आहेत .
पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून दवाखान्यात सदर युवक बोलण्याचा मनस्थितीत नसल्याने जबाब घेता आला नाही . नेमकी मारहाण कोणत्या कारणाने झाली या बाबत तपास सुरू आहे .
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.