Friday, October 17, 2025
Homeजळगावकेवायसी मुळे लाडक्या बहिणींची दिवाळी अंधारात.

केवायसी मुळे लाडक्या बहिणींची दिवाळी अंधारात.

केवायसी मुळे लाडक्या बहिणींची दिवाळी अंधारात.

राज्य सरकारने तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी : सौ. यशश्री पाटील.

यावल.             खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         दि.१७
यावल तालुक्यात व परिसरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी बंधनकारक करणे करण्यात आले आहे.ई केवायसीसाठी लाडक्या बहिणींसमोर दिवाळी सणा सुदित अडचणी निर्माण झाल्या असल्याने लाडक्या बहिणींची दिवाळी अंधारात जाणार असल्याची शंका सौ.यशश्री पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सरकारने या केवायसीच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या सौ. यशश्री देवकांत पाटील यांच्या कडून .
करण्यात आली आहे. संकेतस्थळावर वारंवार एरर येत असून, ओटीपी येत नसल्याने लाडक्या बहिणींच्या

अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सोयगांव तालुक्यात ई-केवायसीच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांची राज्य सरकारने पडताळणी सुरू केली आहे. यासाठी राज्यभरातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली. आता केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत शासनाने दिली आहे. यात ई-केवायसी करण्यासाठी प्रत्येक स्तर सविस्तरपणे सांगितला जात आहे. मात्र, संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याच्या

अनेक तक्रारी वाढल्या आहेत. ई-केवायसीच्या संकेतस्थळावर कुकि केल्यावर त्याला सुरु व्हायला खूप विलंब लागतो. कसेतरी सुरू झाले तर साईडवरून ओटीपी पाठविला असता मोबाइलवर ओटीपी येत नाही. त्यामुळे अनेक महिला तासनतास आपल्याजवळ मोबाइल घेऊन ओटीपीची वाट बघत बसतात. त्यामुळे लाडक्या गैरसोय बहिणींची होत आहे. अनावधानाने

हा मोबाइल वर ओटीपी आला तर तो ओटीपी टाकायचा कुठे? प्रश्न निर्माण झाला आहे. ओटीपी टाकण्यासाठी संकेतस्थळावर बॉक्स उपल नाही. यामुळे लाडक्या बहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करण्यास विलंब लागत आहे. ई-केवायसी प्रक्रिया करताना ओटीपी येत नसल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात समोर येत असून, या समस्या सोडवून ही प्रक्रिया सुलभ करावी आणि ई-केवायसीचे सर्वर सुरळीत चालू करावे व तारीख वाढवावी, अशी मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या सौ योगिता देवकांत पाटील यांनी केली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या