Wednesday, August 26, 2026
Homeभुसावळपत्रकार संतोष शेलोडे यांनी वृक्षारोपणाचे पालकत्व स्वीकारले

पत्रकार संतोष शेलोडे यांनी वृक्षारोपणाचे पालकत्व स्वीकारले

पत्रकार संतोष शेलोडे यांनी वृक्षारोपणाचे पालकत्व स्वीकारले

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरात येथील मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष तसेच खान्देश लाईव्ह न्युजचे संपादक संतोष शेलोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सानेगुरुजी स्मारक जवळ, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वाढते तपमान लक्षात घेऊन, शासन वृक्ष लागवड करण्यासाठी सर्वोतोपरी कामगिरी करीत आहे. झाडांची संख्या कमी झाली असल्यामुळे निसर्ग कोपला आहे. निसर्गाचे संतुलन बिघडले असल्याने पाऊसमान कमी झाला आहे. दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी झाल्यामुळे हवेमध्ये आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन विषारी वायू वातावरणात मिसळत आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून झाड जगविण्याचे पालकत्व संतोष शेलोडे यांनी स्वीकारले आहे. वृक्षारोपण केल्यानंतर याठिकाणी ट्री गार्ड लावण्यात आल्याचे शेलोडे यांनी सांगितले.
याप्रसंगी परिट समाज शहराध्यक्ष रमेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष कैलास शिलोडे, मनोहर लोणे, सुनील अराक, कैलास पारधी, बापू सोनवणे, कैलास शकोकारे, तेजोदिप फाउंडेशनचे सचिव वसंत कोलते, पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचे सुरेंद्रसींग पाटील, कलीम पायलट, कालू शहा, किशोर शिंपी, विनोद गोरधे, सतीष कांबळे, निलेश फिरके, मधुकर पाटील, सागर एएएवाणी, लढे सर, कमलेश चौधरी, संतोष बनसोडे, विनोद सुरवाडे, प्रकाश पवार, दिपक परदेशी, प्रेम परदेशी यांच्यासह मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या