Friday, May 1, 2026
Homeजळगाववरणगावमध्ये पोलिसांचा धाक संपला; जुन्या नगरपालिकेत पोलीसांची कायमस्वरूपी नेमणूक करा

वरणगावमध्ये पोलिसांचा धाक संपला; जुन्या नगरपालिकेत पोलीसांची कायमस्वरूपी नेमणूक करा

वरणगावमध्ये पोलिसांचा धाक संपला; जुन्या नगरपालिकेत पोलीसांची कायमस्वरूपी नेमणूक करा

-वाईन शॉपच्या बाहेरच भरतो बियर बार; बँकेत येणाऱ्या नागरिकांचा मनस्ताप वाढला उपाययोजना करा शिवसेनेची मागणी

वरणगाव –     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               शहरात काही दिवसामध्ये गावात आणि कॉलन्यांमध्ये बंद घराचे दरवाजे तोडून चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक भयभीत झाला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी गस्त वाढवावी तसेच सेंट्रल बँक शेजारी वाईन शॉपच्या बाहेर आवारात सकाळपासून दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सेंटल बँकेत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला हे आर्थिक व्यवहार कारणासाठी येतात परंतु बाजूलाच दारू पिणाऱ्यामुळे बँकेत जाणाऱ्या नागरिकांचा मानसिक त्रास यामुळे वाढला आहे. जेष्ठ नागरिकांसह काही विद्यार्थ्यांनी शिवसेनेकडे याबाबत तक्रार केली. याची दखल घेऊन मंगळवारी दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अमित बागुल यांच्याकडे शिवसेनेतर्फे निवेदन देऊन यावर तत्काळ उपाय योजना करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

शिवसेनेतर्फे पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावात आणि कॉलन्यामध्ये बंद घराचे दरवाजे तोडून चोर चोऱ्या करीत असल्याने सामान्य नागरिक धास्तावला आहे. घरात चोरी करतानाचे चोरांचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये आले असून त्या चोरांचा अजूनही शोध लागला नाही आहे. यामुळे पोलिसांचा धाक संपला असे नागरिक उघडपणे बोलू लागले आहे.

-जुन्या नगरपालिकेत कायमस्वरूपी पोलिस नेमा

गावात असलेल्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये पोलिस चौकी तयार करून कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करा जेणेकरून गावात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक निर्माण होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना याबाबतचे निवेदन देणार असल्याचेही नमूद केले आहे.

-वाईन शॉपच्या बाहेरच भरतो बियर बार

सेंटल बँकच्या बाजूला वाईन शॉप असल्याने दारू पिणारे हे बियर बार सारखे वाईन शॉपच्या बाहेर आवारात खुलेआम दारू पितात. दररोज बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला, जेष्ठ नागरिक, वृद्ध यांची संख्या रोजच मोठ्या प्रमाणात असते. परंतु सेंट्रल बँकेच्या शेजारी वाईन शॉपवर दारू पिणारे सकाळपासूनच गर्दी करतात. यामुळे बँकेत येणारे सामान्य नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून पोलिसांनी यावर निर्बंध घालावे अशीही मागणी शिवसेनेकडून केली आहे.

वरील सर्व मागण्यांची दखल घेऊन तत्काळ कारवाई कारवाई करावी अन्यथा शिवसेनेतर्फे रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी निवेदन देताना शिवसेना भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, भुसावळ तालुका संघटक सुरेश चौधरी, उप जिल्हा संघटक निलेश सुरडकर, युवा सेना तालुका प्रमुख राहुल बावणे, विक्की मोरे, निलेश ठाकूर, सागर वंजारी, गणेश माळी यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या