Wednesday, April 29, 2026
Homeजळगावभुसावळ येथील चौघे एमटीएस परीक्षेत राज्यात अव्वल

भुसावळ येथील चौघे एमटीएस परीक्षेत राज्यात अव्वल

भुसावळ येथील चौघे एमटीएस परीक्षेत राज्यात अव्वल

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    दि 29 शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र टॅलेंट सर्च (एमटीएस) परीक्षेत भुसावळ शहरातील चार विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. यात सेंट अलायसिस स्कूलमधील तीन विद्यार्थी तसेच पोतदार इंटरनॅशनल स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा समावेश असून त्यांनी शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ भुसावळ येथे आयोजित करण्यात आला. देवगिरी इन्स्टिट्यूटच्या कलाम सायंटिस्ट सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला नेत्ररोग तज्ञ डॉ. समीर चौधरी, डॉ. आरती चौधरी, डॉ. तेजल राणे, वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक बापू चौधरी, डॉ. पी. एस. कोळी, अविनाश मोरे, विकास बऱ्हाटे, नीता बऱ्हाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशाने इयत्ता दुसरी ते चौथी व पाचवी ते सातवी या गटांसाठी पूर्वतयारी परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाते. या परीक्षेत सेंट अलायसिस स्कूलमधील इयत्ता दुसरीतील तीर्थ विकास बऱ्हाटे, इयत्ता तिसरीतील निवांत राकेश बठेजा, इयत्ता सहावीतील वेदांत विकास बऱ्हाटे तसेच पोतदार इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता चौथीतील इशिका समीर चौधरी यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

या सर्व विद्यार्थ्यांचा लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नदीम शेख यांनी मानले.

यशस्वी विद्यार्थ्यांसोबत नेत्ररोग तज्ञ डॉ. समीर चौधरी, डॉ. आरती चौधरी, डॉ. तेजल राणे, वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक बापू चौधरी, डॉ. पी. एस. कोळी, अविनाश मोरे, विकास बऱ्हाटे, नीता बऱ्हाटे आदी

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या