Friday, May 1, 2026
Homeजळगाववरणगाव येथे आठ फूट लांबीचा अजगर साप पकडून सुरक्षित जंगलात सोडला

वरणगाव येथे आठ फूट लांबीचा अजगर साप पकडून सुरक्षित जंगलात सोडला

वरणगाव येथे आठ फूट लांबीचा अजगर साप पकडून सुरक्षित जंगलात सोडला
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगाव शहरातील प्रतिभा नगर परिसरात रफाकद मशीद जवळ आठ ते नऊ फुट लांबीचा अजगर (पायथॉन) जातीचा साप आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा साप रात्री सुमारे 9.30 वाजता नागरिकांच्या नजरेस पडला. अचानक घरासमोर मोठा अजगर दिसल्याने परिसरातील रहिवासी भयभीत झाले.

नागरिकांनी तात्काळ सर्पमित्र सचिन कदम यांना संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र सचिन कदम, विजय भाऊ सोनार, शुभम फालक, रेहान शेख व अजय धनगर यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी दक्षतेने अजगराचा सुरक्षित रेस्क्यू करून परिसरातील नागरिकांची भीती दूर केली.

यावेळी प्रतिभा नगर येथील मुस्कान शहा यांनी सुटकेचा श्वास सोडला. रेस्क्यू झाल्यानंतर सर्पमित्रांनी त्या अजगराला जंगलात सुरक्षित सोडून त्याचे प्राण वाचवले.

या कार्यामुळे नागरिकांनी सर्पमित्रांच्या धाडसाचे व संवेदनशीलतेचे कौतुक केले असून वरणगाव शहरातील सर्पमित्रांनी पुन्हा एकदा “निसर्ग रक्षणाचे कार्य” अधोरेखित केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या