Friday, May 1, 2026
Homeजळगावसंत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त वरणगावात सामाजिक उपक्रम

संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त वरणगावात सामाजिक उपक्रम

संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त वरणगावात सामाजिक उपक्रम

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           वरणगाव ता भुसावळ ; दि 20 ऑगस्ट :
संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी २० ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली आहे .
या निमित्ताने ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने वरणगाव येथील समस्त नाभिक मंडळ समाजाला संत सेना महाराज यांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली.

या कार्यक्रमात वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नि .तु .पाटील (बाबा), तुकाराम पाटील, वरणगाव नाभिक समाजाचे अध्यक्ष कमलेश येवले,उपाध्यक्ष श्रीराम सणांसें,खजिनदार रवी पवार,सचिव संतोष रेलकर,सदस्य रवींद्र शिवरामे,गणेश बोरनारे,सुधाकर शिवरामे, राजेंद्र आंबटकर,जंगो न्हावी,तसेच जय डिजिटलचे संचालक राहुल माळी आणि वासुदेव नेत्रालयातील सर्व सहकारी वर्ग उपस्थित होते.

या उपक्रमामुळे समाजात संतांच्या विचारांची जागृती होऊन सामाजिक एकता व ऐक्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
संत सेना महाराज यांच्या जीवनकार्याचा गौरव करत, त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या