वरणगाव येथे भटके विमुक्त दिवस व महिला पदाधिकारी निवडीसाठी बैठक

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भटके विमुक्त बहुजन संघ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसी महिला आघाडी यांची संयुक्त बैठक 24 ऑगस्ट रोजी, रविवार सकाळी 11 वाजता वरणगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याबाबत नियोजन करण्यात येणार असून, त्याचबरोबर तालुका व शहर महिला पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.
या बैठकीस भुसावळ तालुक्यातील तसेच वरणगाव शहरातील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसी महिला आघाडीच्या जळगाव जिल्हा विभाग संघटक सविता माळी, भुसावळ तालुका अध्यक्षा सोनिया गायकवाड, वरणगाव शहर अध्यक्षा लक्ष्मी बैरागी आणि शहर अध्यक्ष गणेश माळी यांनी केले आहे.
तसेच वरणगाव शहरातील भटके विमुक्त समाजातील बांधवांनीही उपस्थित राहावे अशी विनंती भटके विमुक्त बहुजन संघ महाराष्ट्र राज्य तर्फे जेष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड, अरुण धनगर, भास्कर पालिमकर, बंडू कपाटे, रवी पालिमकर, भगवान वंजारी, रफिक शेठ, राजाराम वंजारी, जितेंद्र भाई, राजेश गुंमळकर, नथु पवार, सदाशिव भराडी, देविदास गोसावी, जोगी गुरुजी, कृष्णा धनगर, अंकुश गायकवाड, संदीप कापसे, राजू बैरागी, प्रकाश राजपूत तसेच महिला आघाडीच्या भुसावळ तालुका अध्यक्षा भारती कापसे व इतर पदाधिकाऱ्यांनी

