Tuesday, November 3, 2026
Homeजळगावखावटी योजना सुरू नसल्याचा यावल प्रकल्प कार्यालयाचा खुलासा; आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्यांपासून...

खावटी योजना सुरू नसल्याचा यावल प्रकल्प कार्यालयाचा खुलासा; आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

खावटी योजना सुरू नसल्याचा यावल प्रकल्प कार्यालयाचा खुलासा; आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन

यावल      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         दि.३   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल कार्यालयाकडून आज एक महत्त्वाचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यात ‘खावटी योजना’ च्या नावाने अर्ज भरून घेतले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रशासनाने हा खुलासा केला आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,
“खावटी योजना” अशी कोणतीही योजना या विभागामार्फत किंवा इतर कोणत्याही विभागामार्फत राबविण्यात येत नसून अशा कोणत्याही योजनेचे अर्ज या कार्यालयाकडून मागविण्यात आलेले नाहीत.
प्रसिद्धी पत्रकातील महत्त्वाचे मुद्दे:

1. तक्रार काय होती?
विविध संघटना आणि काही व्यक्तींकडून आदिवासी बांधवांकडून खावटी योजनेचे अर्ज भरून घेतले जात आहेत, अशी तक्रार कार्यालयाला प्राप्त झाली होती.

2. प्रशासनाचा खुलासा:
या नावाची कोणतीही योजना सध्या शासन स्तरावर सुरू नाही. त्यामुळे या योजनेसाठी कोणीही अर्ज करू नये.

3. नागरिकांना आवाहन:
या योजनेच्या नावाने कोणत्याही कार्यालयात, मध्यस्थांकडे किंवा कोणत्याही संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

4. आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा:
खावटी योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून काही व्यक्ती आर्थिक मागणी करत असल्यास अशा आमिषांना आदिवासी बांधवांनी बळी पडू नये. अशा प्रकारची फसवणूक निदर्शनास आल्यास तात्काळ आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास कळवावे.

कार्यालयाचा पत्ता: सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय आवार, चोपडा रोड, यावल, जि. जळगाव – 425301
दूरध्वनी: (02585) 261432
ई-मेल: poitdp.yawal-mh@gov.in

प्रकल्प अधिकाऱ्यांनी पुढे स्पष्ट केले की, भविष्यात या योजनेबाबत काही निर्णय झाल्यास त्याची अधिकृत माहिती विभागामार्फत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या