Tuesday, November 3, 2026
Homeजळगावमहिला महाविद्यालयात छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

महिला महाविद्यालयात छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

महिला महाविद्यालयात छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला          महाविद्यालयात समाजशास्त्र व इतिहास विभागातर्फे     महाराष्ट्रातील किल्ले,* *प्राचीन नाणी व सामाजिक समस्या”* या विषयावर पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माननीय एपी चौधरी सर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले प्राचीन आणि व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या हाताच्या कशापासून चित्रनिर्मिती त्याचे प्रदर्शन करण्यात आले या उपक्रमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यातून वाव मिळाला. महाराष्ट्रातील विविध किल्ले रायगड शिवनेरी दौलताबाद पन्हाळा त्याचबरोबर ट्रेकिंग या विषयावर छाचित्रांचे प्रदर्शन वाखाणण्याजोगे होते तसेच
प्रदर्शनात विविध सामाजिक समस्यांवर आधारित पोस्टर व भित्तिपत्रिका पत्रके तयार करण्यात आली. स्त्री पुरुष समानता, पेपर फुटी प्रकरण, ताण-तणाव, सोशल मीडियाचा अतिरेक, लिंगनिदान चाचणी, साक्षरता यासारख्या समस्यांवर आधारित भित्तिपत्रकांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाने ऐतिहासीक परंपरा व इतर माहिती विद्यार्थ्या पर्यन्त पोहचली व ज्ञानात भर पडली .
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता या छोट्या खाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ दीपक शिरसाट यांनी केले व या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. साधना जावळे, डॉ. दीपक शिरसाट, डॉ. कांचन देसले, प्रा. वैशाली निकम व विद्यार्थिनींनी विशेष सहकार्य केले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या