बामणोद येथे पारंपारिक पद्धतिने बैल पोळा सण उत्साहात साजरा :
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी बामणोद ता. यावल येथे बैल पोळा सण पारंपरिक पद्धतीने ऊत्साहात साजरा करण्यात आला काही वर्षापासून बैलांची संख्या घटत अजून सुद्धा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला आहे .
सालाबादप्रमाणे या वर्षी ही बळीराज्याच्या लाडक्या सर्जा राज्याचा सण असलेला पोळा हा सण मोठ्या उत्साहात जल्लोशात साजरा करण्यात आला .
या निमित्ताने आदल्या दिवशी उत्तम साबण व सुगंधी उटणे लाऊन लाडक्या सर्जा राजा ची आंघोळ करण्यात आली व खांदा मळण करण्यात आली व त्यांना आमंत्रण देण्यात येत असते व नंतर गावातील नातेवाईक व संबंधितांच्या घरी जाऊन त्यांच्या बैलांना आमंत्रण देण्यात आले व सकाळी बैलांच्या शिंगाना विवीध रंगानी रंगविण्या आले व ऊत्तम साज व घुंगराच्या व फुलांच्या हारांनी सजविण्यात आले दुपारी बारा वाजेला गाववेशीवरील मरीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले व नंतर बैलांना आप आपल्या घरी आणून महिलांनी मोठ्या आनंदात व भक्तिभावाने पुजन करून पुरण पोळी चा नैवद्या घालण्या आला व नंतर

संबंधितांच्या घरी नेऊन नैवद्य खाऊ घालण्यात आले
मुलांनी बैलांना पळवून आनंद साजरा केला व संध्याकाळी सर्जा राजाची गुलाल ऊधळून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली .
वर्षभर राबुन शेतकऱ्यांना पीक मिळवून देणाऱ्या सर्जा राजा बैलाला वर्षभरात एकच दिवस महत्व दिले जाते . याच अनुषंगाने पोळा ह्या सणाचे महत्व गाव खेड्यात अजुनही कायम आहे .