Monday, March 9, 2026
Homeजळगावशिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध – अरुणा इंगळे यांचा जागतिक महिला दिन संदेश”

शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध – अरुणा इंगळे यांचा जागतिक महिला दिन संदेश”

शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध – अरुणा इंगळे यांचा जागतिक महिला दिन संदेश”

भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               दि 9
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वरणगाव शहराच्या उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगताना, “माझे माहेर तळवेल असले तरी माझे संपूर्ण शिक्षण तळवेल गावात झाले. त्या शिक्षणाच्या बळावरच मी वरणगाव शहरात समाजकार्य आणि राजकारणात सक्रिय झाले,” असे त्यांनी सांगितले.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर महसूल उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे ,विभागाच्या मंडळ अधिकारी रंजना तायडे ,तलाठी रेणूका पाटील, तळवेल सरपंच विद्या ताई भारसके, अम्रपाली गवई, नगरसेविका तृप्ता महाजन,माजी सरपंच इंदिरा ताई पाटील ,रेखा देशमुख,किरण अहिर,क्रांती सुरवाडे,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याधापीका ज्योती सैंदाणे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते .ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचा साळी ,चोळी आणि दिवा देवून ‘सत्कार करण्यात आला .यावेळी शाळेतील विद्यार्थीनी व महिलांनी सास्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता .

पुढे इंगळे ताई यांनी सांगितले की, वरणगाव ग्रामपंचायत काळात त्यांनी सरपंच पद भूषवले असून नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. सध्या त्या उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असून गेल्या २५ वर्षांपासून वरणगाव शहरात राजकारण आणि समाजकारण करत आहेत.
महिलांच्या प्रगतीबाबत बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत, “महिलांना शिक्षणाची दारे उघडून देण्याचे मोठे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांच्यामुळेच आज महिला शिक्षण आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात आहेत,” असे सांगितले.
तसेच जागतिक महिला दिनाबाबत बोलताना त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, भारतात महिलांना अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग भारतीय संविधानामुळे मिळाला आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज महिलांना समान हक्क मिळाले असून आपण हा दिवस अभिमानाने साजरा करतो,” असे त्या म्हणाल्या.विद्यार्थिनींना प्रेरणा देताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रसिद्ध वचनही सांगितले, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” त्यामुळे मुलींनी शिक्षण घ्यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांच्या सक्षमीकरणात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आज प्रत्येक महिला सक्षम होत असून यामागे शिक्षणाचे मोठे योगदान आहे. शिक्षणामुळे महिलांना आपल्या हक्कांची जाणीव झाली असून त्या समाजातील विविध क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत आहेत.दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करून समाजात महिलांच्या कार्याची आणि योगदानाची जाणीव करून दिली जाते. आजच्या आधुनिक काळात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सातबारा उताऱ्यावर पतीच्या संमतीने पत्नीचे नाव नोंदविण्याचा अधिकार देण्यात येत आहे. यामुळे महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव होऊन स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला होतो.ही योजना महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. रंजना तायडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता फेगडे यांनी केले तर आभार सरपंच विद्या ताई भारसके यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसरपंच सुर्वणा पाटील , रत्नाताई कोळी तसेच सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या व तळवेल ग्रामपंचायत यांनी परिश्रम घेतले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या