“नशा नव्हे, भक्तीचा उत्सव साजरा करा” – अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे वरणगांव येथे आवाहन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता. भुसावळ दि २३ ऑगस्ट :
येथे गणेशोत्सव व ईद-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता वरणगाव पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडली.या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी उपस्थित गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांना मार्गदर्शन केले.
नखाते यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की,उत्सवाच्या मिरवणुकीत मद्यपान किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या नशेचा वापर टाळावा.आपला उत्सव हा श्रद्धा,भक्ती पूर्वक व सामाजिक बांधिलकी जपणारा असावा. भक्तीची नशा हवी,व्यसनांची नव्हे.त्यांनी सर्व मंडळांना सामाजिक जाणीव ठेवून नवनिर्माणात्मक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.
बैठकीस फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बळगुजर,सपोनि अमितकुमार बागुल,पीएसआय बेंडकोळी, नगरपालिका अधिकारी रशिद नौरंगाबादी तसेच शांतता समितीचे सदस्य आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना सपोनि अमित कुमार बागुल यांनी केली.यावेळी मंडळांनी गणेशोत्सवाच्या आयोजनातील अडचणी व समस्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या ,त्यावर सकारात्मक चर्चा होऊन निराकरणाचे आश्वासनही अधिकाऱ्या कडून देण्यात आले.
बैठकीस उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये अल्ला उद्दीन शेठ ,सुनील काळे,हिप्पी शेठ,विलास मुळे,राजेंद्र चौधरी,शेख सईद,आसीफ शेख, नाना चौधरी,अशफाक काझी,मिलिंद मेढे, साजिद कुरेशी,विवेक चौधरी,अक्षय चौधरी, अश्विनी पाटील,मनिषा पाटील,दिव्या पाटील, सरला पाटील,प्रशांत सूर्यवंशी,नितीन सोनवणे, हर्षल पाटील,निखिल महाजन,प्रविण महाजन, शिवराम गोसावी,अरुण तायडे,तितोक पाटील, गिरीष पाटील,चंदकांत पाटील,वासुदेव इंगळे, दीपक चौथे,राजू गायकवाड यांचा समावेश होता.संपूर्ण बैठकीत शांतता,सलोखा व एकोप्याने उत्सव साजरा करण्याचा संकल्प घेण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए एस आय श्रावण जवरे व पो .हे कॉ विजु बावस्कर यांनी परिश्रम घेतले .

