Friday, May 1, 2026
Homeजळगावअवतरण दिनानिमित्त चिकित्सा विभागाचे लोकार्पण व भव्य रक्ततुलेचे आयोजन

अवतरण दिनानिमित्त चिकित्सा विभागाचे लोकार्पण व भव्य रक्ततुलेचे आयोजन

अवतरण दिनानिमित्त चिकित्सा विभागाचे लोकार्पण व भव्य रक्ततुलेचे आयोजन

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त दि. २८ ऑगस्ट २०२५ गुरुवार या दिवशी तुलसी हेल्थ केअर सेंटर, निष्कलंक धाम, वढोदा फैजपूर येथे ‘नूतन प्राकृतिक चिकित्सा’ विभागाचे लोकार्पण तथा भव्य रक्ततुलेचे आयोजन करण्यात आले आहे. या

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष तीर्थक्षेत्र प्रेरणापीठ अहमदाबादचे परमपूज्य जगद्गुरु सतपंथाचार्य श्री ज्ञानेश्वरदेवाचार्य जी महाराज भूषविणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील संत- महंत तथा लोकप्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

 


दि. २७ रोजी रात्री आठ वाजता हभप नितीन महाराज मलकापूर यांचे कीर्तन होणार असून दि. २८ रोजी सकाळी ९-०० ते ११- ०० दरम्यान महाराजांची रक्ततुला तसेच श्री निष्कलंक व्हिजन सेंटर फैजपूर तथा मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांच्यातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या