Friday, May 1, 2026
Homeगुन्हाविवाहिता आत्महत्याप्रकरणी पतीला अटक !

विवाहिता आत्महत्याप्रकरणी पतीला अटक !

विवाहिता आत्महत्याप्रकरणी पतीला अटक !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वरणगाव येथील भंगाळेवाडा परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २१ गुरुवार रोजी सकाळी घडली. योगिता धिरज भंगाळे असे मयत विवाहितेचे नाव असून, तिच्या आत्महत्येस पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कारणीभूत धरले जात आहे. याप्रकरणी पतीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मयत महिलेचे वडील सुभाष रामकृष्ण वराडे (वय ६०, रा. काहुरखेडा, ता. भुसावळ) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पती धिरज कडू भंगाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार योगिता हिचे लग्न १५ वर्षांपूर्वी धिरज भंगाळे याच्याशी झाले होते. लग्नानंतरपासूनच पतीकडून शारीरिक आणि मानसिक त्रास सुरु होता-योगिताला दोन अपत्ये आहेत. काही दिवसांपूर्वी, स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी असल्याने ती आपल्या दोन मुलांसह माहेरी काहुरखेडा येथे आली होती-दि.२१ गुरुवार रोजी सकाळी योगिताने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात पती धिरज कडू भंगाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि अमित कुमार बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पुढील घटनेचा तपास पीएस आय मंगेश बेंडकोळी करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या