Friday, May 1, 2026
Homeजळगावविमुक्त दिनानिमित्त समाजासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र व मंत्रालयाच्या पुनर्स्थापनेची मागणी

विमुक्त दिनानिमित्त समाजासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र व मंत्रालयाच्या पुनर्स्थापनेची मागणी

विमुक्त दिनानिमित्त समाजासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र व मंत्रालयाच्या पुनर्स्थापनेची मागणी

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             वरणगाव ता भुसावळ,१ सप्टेंबर:
भटके-विमुक्त दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजाच्या समस्या,हक्क आणि विकासाच्या मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठवण्यात आला.कार्यक्रमात उपस्थित प्रमुख वक्ते अॅड. शिरीष कुमार जाधव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितले की,“भटके-विमुक्त दिन साजरा करणे औपचारिक ठरू नये.त्यामागील उद्देश समजून घेणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

स्वतंत्र संशोधन केंद्राची गरज –
जाधव यांनी भटके-विमुक्त समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र (Research Centre) स्थापन करण्याची मागणी केली. “हे केंद्र आसाराम गुरुजी यांच्या नावाने सुरू करावे, कारण ‘महाज्योती’सारख्या संस्थांमध्ये भटके-विमुक्त समाजाला स्वतंत्र ओळख मिळत नाही,असे ते म्हणाले.

मंत्रालयाच्या पुनर्स्थापनेचा मुद्दा
स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेले भटके-विमुक्त समाजासाठीचे स्वतंत्र मंत्रालय आता इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे भटके-विमुक्त समाजाच्या योजना व निधी अन्य घटकांमध्ये मिसळून जात आहेत. हे मंत्रालय पुन्हा भटके-विमुक्त समाजाच्या नावानेच कार्यान्वित करावे, अशी ठाम मागणी जाधव यांनी केली.
यावेळी भटके विमुक्त बहुजन संघ राज्य अध्यक्ष शिरीष जाधव,भटके विमुक्त बहुजन युवा राज्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड,विदर्भ प्रमुख भटके विमुक्त बहुजन संघ रामदास जाधव,नाशिक जिल्हा अध्यक्ष भटके विमुक्त बहुजन संघ दिपक जाधव,माजी नगराध्यक्ष सुनील काळे,माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, सपोनि अमित कुमार बागुल,प्रशांत पाटील, अतुल झांबरे,राजेश इंगळे,सुभाष चौधरी, शिवसेना महिला शहर अध्यक्षा श्रद्धा गायकवाड,रशिद नौरंगाबादी,आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच भटके विमुक्त बहुजन संघ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी साठी रवींद्र गायकवाड,राजू गायकवाड,गणेश माळी,निलेश माळी,सोनिया गायकवाड,केशव लोंढे,अरुण धनगर,भगवान वंजारी, रफिक पठाण,भास्कर पालीमकर, लक्ष्मी बैरागी,सरुबाई वाघमारे,मनीषा पाटील, उर्मिला चौधरी,भारती कापसे,संध्या पवार,प्रकाश गुंमळकर,विलास गुंजाळ, शामराव धनगर,संजय धनगर,कृष्णा धनगर, शालिक धनगर,राजू धनगर,रवी पालीमकर, बंडू कपाटे,कमलाबाई माळी,महेश सोनवणे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन संध्या पवार यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या