Friday, May 1, 2026
Homeजळगावराष्ट्रीय छात्र सेनेमुळे जीवनाला शिस्त लागते – प्राचार्य तायडे

राष्ट्रीय छात्र सेनेमुळे जीवनाला शिस्त लागते – प्राचार्य तायडे

राष्ट्रीय छात्र सेनेमुळे जीवनाला शिस्त लागते – प्राचार्य तायडे

दहावीच्या एनसीसी कॅडेट्सना ‘A’ सर्टिफिकेटचे वाटप

वरणगाव.         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             ता भुसावळ दि १०ः
राष्ट्रीय छात्र सेनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होते तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात शिस्तबद्धतेची सवय लागते. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येतो, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सी.जे.तायडे यांनी केले.

महाविद्यालयात नुकताच इयत्ता दहावीतील एनसीसी कॅडेट्सना ‘A’ सर्टिफिकेट वाटप समारंभ पार पडला.या वेळी निरोप समारंभ व समूह छायाचित्र सत्राचे आयोजनही करण्यात आले.कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य सी.जे.तायडे, संस्थेचे संचालक प्रशांत झोपे, उपमुख्याध्यापक बी.एम.राठोड,पर्यवेक्षक आर.एस.कोल्हे,डी.आर.कोळंबे,पी.एस.झोपे, एनसीसी ऑफिसर सतीश मोरे,उपशिक्षक पी.एन.सोळंके,आर.डी.पाटील तसेच एनसीसी सार्जंट व विद्यार्थी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांची भावना अधिक दृढ झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून एनसीसीमुळे मिळालेल्या अनुभवांची व शिस्तबद्धतेची सकारात्मक पातळीवर जाणीव व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या