Friday, May 1, 2026
Homeजळगावमहात्मा गांधी विद्यालयाचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी डाव

महात्मा गांधी विद्यालयाचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी डाव

महात्मा गांधी विद्यालयाचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी डाव

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कबड्डी संघाची निवड

वरणगाव           खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           ता .भुसावळ दि ९:
बियाणी मिलिटरी स्कूल,भुसावळ येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय शासकीय कबड्डी स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.या स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात महात्मा गांधी विद्यालयाच्या कबड्डी संघाने शानदार विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या विजयामुळे महात्मा गांधी विद्यालयाच्या कबड्डी संघाची निवड जळगाव जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी करण्यात आली असून,या कामगिरीने संपूर्ण विद्यालयाचा सन्मान वाढवला आहे.कबड्डी संघाच्या यशामध्ये क्रिडा शिक्षक लक्ष्मीकांत नेमाडे व सुनील चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक प्रयत्नांचे फलित म्हणजेच आजचा हा विजय.

या यशाबद्दल शाळासमिती अध्यक्ष चंद्रकांतजी हरी बढे सर,संस्थेच्या अध्यक्षा सौ.वंदनाताई पाटील मॅडम,संपूर्ण कार्यकारिणी मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य सी.जे.तायडे सर,तसेच सर्व पर्यवेक्षक,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या